Join us  

​मे आय कम इन मॅडम या मालिकेमुळे पूर्ण झाली नेहा पेंडसेची ही इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2017 6:30 AM

मे आय कम इन मॅडम या मालिकेत नेहा पेंडसे सध्या संजना ही भूमिका साकारत आहे. या मालिकेमुळे तिची एक ...

मे आय कम इन मॅडम या मालिकेत नेहा पेंडसे सध्या संजना ही भूमिका साकारत आहे. या मालिकेमुळे तिची एक कित्येक वर्षांपासूनची इच्छा पूर्ण झाली आहे. त्यामुळे सध्या ती खूपच खूश आहे. नेहाला बाईकचे प्रचंड क्रेझ आहे. एकदा तरी आपण बाइक चालवावी असे तिला अनेक वर्षांपासून वाटत आहे. बाइक चालवायची इच्छा असली तरी तिला आजपर्यंत कधीच बाइक शिकायची संधी मिळाली नव्हती. पण मे आय कम इन मॅडम या मालिकेमुळे तिची ही इच्छा पूर्ण झाली आहे. मे आय कम इन मॅडम या मालिकेसाठी नेहाला बाइक चालवायला लागणार आहे हे कळल्यानंतर ती खूपच खूश झाली होती. तिला मालिकेच्या टीमने ही गोष्ट सांगितल्यानंतर तिने लगेचच यासाठी होकार दिला आणि बाइक शिकायला सुरुवात केली. यासाठी तिला तिच्या मालिकेच्या टीमने खूप मदत केली. दोन प्रसंगाच्या मध्ये मिळणाऱ्या वेळेच ती बाइक शिकत असे. विशेष म्हणजे केवळ एका दिवसांत ती बाइक चालवायला शिकली. याविषयी नेहा सांगते, "मला बाइकचे खूप वेड आहे. पण मला कधीच बाइक चालवायला मिळाली नव्हती. मालिकेच्या एका प्रसंगात बाइक चालवायची आहे हे कळल्यानंतर मी खूपच खूश झाली. या प्रसंगात बॉडी डबलचा वापर न करता मी बाइक शिकायचे ठरवले. खरे तर बाइक चालवायची माझी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. या मालिकेमुळे ती पूर्ण झाली. मला बाइक शिकवण्यासाठी मी माझ्या संपूर्ण टीमची आभारी आहे."