Join us  

‘मुस्कान’मध्ये प्रमुख भूमिकेत नेहा मर्दा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 9:07 AM

‘बालिका बधू’, ‘डोली अरमानों की’ आणि अन्य मालिकांतील शक्तिशाली भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान प्राप्त केलेली अभिनेत्री नेहा मर्दा ...

‘बालिका बधू’, ‘डोली अरमानों की’ आणि अन्य मालिकांतील शक्तिशाली भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान प्राप्त केलेली अभिनेत्री नेहा मर्दा लवकरच पुन्हा टीव्हीच्या पडद्यावर दिसणार आहे.रश्मी शर्मा प्रॉडक्शन्स या संस्थेची निर्मिती असलेल्या नव्या मालिकेतील एका महत्त्वाच्या भूमिकेसाठी नेहाची निवड करण्यात आली आहे. आपल्या ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेनंतर निर्माती रश्मी शर्मा आता ‘स्टार प्लस’साठी नवी मालिका तयार करीत आहे. या मालिकेने तुफान लोकप्रियता मिळविली होती आणि ती तब्बल सात वर्षे या वाहिनीवरून प्रसारित होत होती. रश्मी आता एका अगदी वेगळ्याच विषयावरील (एका सेक्स वर्करच्या जीवनावरील) कथानक असलेल्या मालिकेच्या निर्मितीत व्यस्त आहे.या मालिकेला यापूर्वी ‘तवायफ’ आणि ‘मीना बाजार’ अशी शीर्षके देण्यात आली होती; परंतु आता या मालिकेचे ‘मुस्कान’ असे नामकरण करण्यात आले आहे. “यापूर्वी तवायफ मालिकेतील प्रमुख भूमिकेसाठी हीना खान, टिना दत्ता, माही विज वगैरे बड्या अभिनेत्रींच्या नावांची चर्चा सुरू होती. परंतु आता नेहा मर्दा ही सुंदर अभिनेत्री ही भूमिका साकारील, अशी दाट शक्यता आहे,” असे एका खात्रीलायक सूत्राने सांगितले. नेहाने या मालिकेच्या करारावर अजून स्वाक्षरी केलेली नसली, तरी ही शक्तिशाली आणि आव्हानात्मक भूमिका रंगविसाठी नेहा खूपच उत्सुक झाली आहे, असे समजते. एकंदर कानावर येत असलेल्या बातम्यांवरून रश्मी शर्माची ही आगामी मालिका ‘स्टार प्लस’वरील सर्वात मोठी मालिका असेल, अशी चिन्हे दिसत आहेत. या मालिकेचे प्रसारण मार्चमध्ये सुरू होईल, अशी शक्यता आहे.