Join us  

में मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो या मालिकेच्या सेटवर निलू वाघेलाला मिळाही ही नवी मैत्रीण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2018 6:00 AM

मालिकांचे शूटिंग सुरू असताना टेलिव्हजनवरील कलाकारांचे एकमेकांशी सूर जुळल्याची आपण बरीच उदाहरणं पाहतो. रोज एकमेकांबरोबर १०-१२ तास एकत्र घालवल्यावर ते एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे ओळखायला लागतात. असाच सूर जुळला आहे सोनीच्या 'मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो' सेटवर.

सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनवर में मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो ही मालिका प्रसारित होत असून यात सृष्टी जैन आणि नमिश तनेजा यांच्या मुख्य भूमिका आहेत. या दोघांच्याही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेतील कलाकार सध्या त्यांच्या व्यक्तिरेखांवर प्रचंड मेहनत घेत आहेत. 

मालिकांचे शूटिंग सुरू असताना टेलिव्हजनवरील कलाकारांचे एकमेकांशी सूर जुळल्याची आपण बरीच उदाहरणं पाहतो. रोज एकमेकांबरोबर १०-१२ तास एकत्र घालवल्यावर ते एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे ओळखायला लागतात. असाच सूर जुळला आहे सोनीच्या 'मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो' सेटवर. सृष्टी जैन म्हणजे जया आणि निलू वाघेला म्हणजे सत्यादेवी या मालिकेत आई-मुलीच्या भूमिका साकारत आहेत. या मालिकेमुळे त्या दोघी एकमेकींच्या खूपच जवळच्या मैत्रिणी झाल्या आहेत. निलू वाघेला में मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो या मालिकेत एका आईची भूमिका साकारत आहे. तिचं एकच ध्येय आहे ते म्हणजे तिच्या मुलींचं भलं आणि जया ही एक 'हॅपी गो लकी' स्वभावाची मुलगी आहे. ती तिचा नवरा म्हणजे समरवर (नमिश तनेजा) वेड्यासारखं प्रेम करते. पडद्यावर निलू आणि आणि सृष्टी या आई-मुलगी दाखवल्या असल्या तरी त्या एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी देखील आहेत आणि प्रत्यक्षातही त्यांच्यातील बंध मजबूत झाला आहे. दोघी नेहेमीच म्हणजे अगदी ब्रेकमध्येसुद्धा एकत्र असतात. सृष्टी आणि निलूच्या आवडीही सारख्या आहेत. दोघींनाही फॅशन, गॅजेट्स आणि मनोरंजन विश्वातील घडामोडी यात रस आहे. याबद्दल विचारल्यावर निलू वाघेला सांगते, "सृष्टी अगदी माझ्या खऱ्या मुलीसारखी आहे. शूटिंगच्या पहिल्या दिवसापासूनच आमचं एकमेकांशी पटायला लागलं. असा एकही दिवस जात नाही, जेव्हा आम्ही एकत्र नसतो. इंडस्ट्रीमधील गोष्टींची देवाणघेवाण, फोटो काढणं, आवडत्या पदार्थाच्या रेसिपी सांगणं या सर्व गोष्टी आम्ही शेअर करतो. ती माझा अनेक गोष्टींत सल्ला देखील विचारते. मी कल्पनाही केली नव्हती की, सृष्टी आणि मी एवढ्या चांगल्या मैत्रिणी होऊ शकतो. पडद्यावरच्या आई आणि मुलीपेक्षा आम्ही खऱ्या आयुष्यातल्या मैत्रिणी आहोत."

टॅग्स :में मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो