Join us  

गरिमा सिंगची भूमिका नीलिमा सिंग साकारणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 5:36 PM

नीलिमा सिंग यांनी 'उतरन','बेगुसराई' आणि 'क्वीन्स है हम' अशा मालिकांमधून काम केले आहे. त्यांनी भोजपुरी चित्रपटांमधूनही काम केले आहे.

छोट्या पडद्यावर सध्या 'निम्की मुखिया' ही मालिका गाजते आहे. हटके कथानकामुळे या मालिकेला रसिकांनी डोक्यावर घेतलं आहे. रसिकांची आवडती मालिका म्हणून 'निम्की मुखिया' या मालिकेला पसंती मिळाली आहे.  मालिकेतील सगळ्याच कलाकारांचा अभिनय रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.

मालिकेत गरिमा सिंग ही मालिका सोडणार असल्याच्या बातम्या येत आहेत. काही दिवसांपासून  गरिमा मालिका सोडणार असल्याच्या फक्त चर्चाच रंगत होत्या. गरिमा यांच्या जागी कोण येणार याचीच उत्सुकता सर्वांना आहे. गरिमा यांनी ह्या मालिकेत अनारो देवीची भूमिका साकारली. मात्र, अशी बातमी आहे की अभिनेत्री नीलिमा सिंगच्या जागी  आता गरिमा यांची वर्णी लागली आहे.

नीलिमा सिंग ह्या एक लोकप्रिय भोजपुरी अभिनेत्री असून त्यांच्या आधीच्या व्यक्तिरेखांमुळे त्यांना अनारो देवीच्या भूमिकेत शिरायला नक्कीच मदत होईल. अनारो देवी एक खंबीर आणि तेज असून ह्या मालिकेतील खलनायिका म्हणून उठून दिसते. निर्मात्यांच्या मते नीलिमा सिंग ह्या भूमिकेसाठी योग्य असून त्या ही भूमिका उत्तमपणे साकारतील. नीलिमा सिंग यांनी 'उतरन','बेगुसराई' आणि 'क्वीन्स है हम' अशा मालिकांमधून काम केले आहे. त्यांनी भोजपुरी चित्रपटांमधूनही काम केले आहे.नीलिमा सिंग म्हणाल्या की, “ सध्या तरी माझे सारे लक्ष या भूमिकेवर आहे. नक्कीच मी थोडी नर्व्हस आहे आणि उत्साहीसुद्धा आहे. मुळात माझी पार्श्वभूमी भोजपुरी असल्यामुळे अनारोची बोली माझ्यासाठी सोपी पडली. मी हळूहळू ही भूमिकेत स्वतःला अॅक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करत  आहे. तसेच आता रसिकांनीही ही भूमिका अॅक्सेप्ट करतील अशी आशा आहे. 

गरिमा सिंहने मालिकेतील आपल्या अखेरच्या प्रसंगाचे चित्रीकरण संपवले आहे. तिचे निर्मात्यांशी ब-याच दिवसांपासून काही वाद होते, असे सांगितले जाते. परंतु निर्मात्यांनी हे वाद मिटविण्यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत,त्यामुळे ही मालिका सोडण्याचा निर्णय गरिमाने घेतला.अधिक माहिती देताना गरिमाने सांगितले की, मला अन्य मालिकांमध्ये मर्यादित प्रमाणात भूमिका साकारावयाची होती, पण मला त्यासाठी परवानगी नाकारण्यात आली. तेव्हा मी झामाजी यांच्याशी प्रत्यक्ष बोलून माझी बाजू मांडली, तेव्हा मला परवानगी देण्यात आली.”