Join us  

'खतरों के खिलाडी १०' मधून बाहेर झाली ही अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 4:10 PM

'खतरों के खिलाडी १०' या रिअॅलिटी शोचे शूटिंगसध्या बल्गेरियामध्ये सुरु आहे. या शोचे टेलिकास्ट 2020 मध्ये टिव्हीवर होणार आहे.

'खतरों के खिलाडी १०' या रिअॅलिटी शोचे शूटिंगसध्या बल्गेरियामध्ये सुरु आहे. या शोचे टेलिकास्ट 2020 मध्ये टिव्हीवर होणार आहे. आजकतच्या रिपोर्टनुसार या शोमधून अदा खान एलिमिनेट झाली आहे. एलिमिनेशन राऊंडमध्ये अदाने स्टंट 100 टक्के देऊन केला मात्र तरीही स्वत:ला एलिमिनेट होण्यापासून वाचवू शकली नाही.  

अदा खान टॉप 6 कंटेस्टेंट्सच्या लिस्टमधून बाहेर गेली. आता शोमध्ये धर्मेश येलांडे, करिश्मा तन्ना, करण पटेल, तेजस्विनी प्रकाश, शिविन नारंग, बलराज सयाल बाकी आहेत. बलराज सयाल शोमध्ये वाईल्ट कार्ड एंट्री घेऊन सहभागी झाला आहे.

'खतरों के खिलाडी १०'मध्ये पहिले एलिमिनेशन भोजपुरी अभिनेत्री राणी चटर्जीचे झाले होते.  राणी चटर्जी ही 'ससुरा बडा पैसेवाला' या तिच्या चित्रपटासाठी ओळखली जाते.  खतरों के खिलाडी 9' सीझन खूप हीट झाला होता. खतरों के खिलाडी सीझन १० शूटिंगसाठी १ महिना बल्गेरियाला गेले आहेत.

अदा खानन ' या अमृत सितारा' मध्ये दिसली होती. यात अदाने ताराची मुख्य भूमिका साकारली होती. राजस्थानच्या पार्श्वभूमीवर ही कथा घडत असल्यामुळे निर्मात्यांनी राजेशाही लूक यावा म्हणून जैसलमेर मध्ये चित्रीकरण केले होते. ऐवढेच नाही तर अदा एका कॉमेडी शोमध्ये सुनिल ग्रोव्हर सोबत दिसणार आहे. बॉलीवूड अभिनेता कुणाल खेमू छोट्‌या पडद्यावर पदार्पण करत असून तो या शोचे सूत्रसंचालन करताना दिसून येईल.

टॅग्स :अदा खान