माझं पहिलं प्रेम ‘डान्स’-अभिनेत्री मीरा जोशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 18:40 IST
अबोली कुलकर्णीबोल्ड अॅण्ड ब्युटीफुल असलेली मराठी इंडस्ट्रीची अभिनेत्री मीरा जोशी सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘तुझं माझं ब्रेकअप’ मालिकेत ...
माझं पहिलं प्रेम ‘डान्स’-अभिनेत्री मीरा जोशी
अबोली कुलकर्णीबोल्ड अॅण्ड ब्युटीफुल असलेली मराठी इंडस्ट्रीची अभिनेत्री मीरा जोशी सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘तुझं माझं ब्रेकअप’ मालिकेत ग्रे शेड असलेली मेनका व्यक्तिरेखा साकारत आहे. समीर-मीरा यांच्या लव्हस्टोरीत ती महत्त्वाची भूमिका साकारतेय. तिच्या या व्यक्तिरेखेविषयी आणि आत्तापर्यंतच्या कारकिर्दीविषयी मीरा जोशी हिच्याशी साधलेला हा संवाद.* डान्सिंग, मॉडेलिंगपासून तू करिअरला सुरूवात केलीस. अनेक हिंदी, मराठी मालिका, चित्रपट यानंतर आता ही मालिका कसं वाटतंय? - खूप छान वाटतंय. अभिनय करणं हे कधीही माझं पहिलं प्रेम नव्हतं. मला डान्सिंगमध्येच करिअर करायचं होतं. मी कथ्थक, भरतनाट्यम शिकले होते. मुंबईला येऊन मी आॅडीशन्स आणि स्पर्धांमध्येही भाग घेतला. एक डान्स रिअॅलिटी शो करत असताना माझ्या पाठीला दुखापत झाली. मला डॉक्टरांनी सांगितलं की, तू आता डान्स करू शकणार नाहीस. मग मला ‘माझे मन तुझे झाले’ची आॅफर आली. मी हीच आयुष्याने दिलेली संधी समजून स्विकारली. आणि मग माझा अभिनयाचा प्रवास सुरू झाला. ‘तुझं माझं ब्रेकअप’मध्ये मेनकाची भूमिका करताना मला मजाच येत आहे. कुठलाही गॉडफादर नसताना हा सगळा प्रवास करणं माझ्यासाठी खूप कठीण होतं.* रोहिणी हट्टंगडी, उदय टिकेकर, राधिका विद्यासागर, विजय निकम यांसारख्या ज्येष्ठ मंडळींसोबत काम करताना सेटवर कधी दडपण येतं का? - दडपण काहीच नसतं. अगदी फ्रेंडली वातावरण असतं. सगळयांत महत्त्वाचं म्हणजे रोहिणी ताई, राधिका ताई घरून डब्बा आणतात. मग आम्ही सगळेजण त्यावर ताव मारतो. या सर्व मंडळींसोबत काम करताना कधीही भीती वाटत नाही. हे श्रेय त्यांनाच द्यायला हवं कारण त्यांनीच आमच्यातील बाँडिंग एवढी ग्रेट केलीय की, आम्हाला त्यांच्यासोबत काम करताना दडपण येत नाही. बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळतात. त्यांचं वाचन खूप असतं. सीनच्या दरम्यान ते वेळ काढून वाचन करतात. प्रसंगी ते दिग्दर्शकांना सांगतातही की, आपण थोडंसं वाचूया मग सीन करूया. पण, आम्ही मात्र दिवसभर सतत एकामागोमाग सीन शूट करत असतो. * तू अँकरिंग, कोरिओग्राफी केली आहेस. आयटम साँग्स, लाइव्ह शोज, अल्बम्स मध्येही तू काम केले आहेस. कोणत्या प्रकारांत काम करायला तुला जास्त आवडतं? अभिनय की डान्स?- आता मला दोन्हीही आवडायला लागलं आहे. फक्त डान्स हे माझं पहिलं प्रेम आहे. डान्सपासूनच माझ्या करिअरला सुरूवात झाली होती. काम कुठलंही असो व्यक्तीला आनंद मिळणं आवश्यक असतं. मला या दोन्ही गोष्टींतून मिळतो त्यामुळे मी खुश आहे.* अभिनयक्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या स्ट्रगलर्सना तू कोणता संदेश देशील?- मी एवढंच म्हणेन की, स्वत:वर विश्वास ठेवा, स्वत:च्या कामाशी प्रामाणिक राहा. कारण, तुम्हाला मागे खेचणारे, चुकीचा रस्ता दाखवणारे लोक खूप असतात. त्यांच्याक डे दुर्लक्ष करून आपण स्वत:वर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्पर्धा खूप आहे पण, संधीही बऱ्याच आहेत. त्यामुळे मेहनतीची तयारी असेल तर नक्कीच या क्षेत्रात येण्याचा विचार करा.* सध्या सोशल मीडियावर स्टार्सना ट्रोल करण्याचे प्रमाण वाढले आहे. याकडे तू कसे पाहतेस?- सोशल मीडिया हे माध्यम आता सध्या काळाची गरज बनली आहे. चाहत्यांनी आमच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजेच सोशल मीडिया. कधी कधी सोशल मीडियावर स्टार्सना ट्रोल के ले जाते. पण, चाहत्यांनी देखील विचारपूर्वकच पोस्ट कराव्यात.