Join us

'मोनिका' नव्या अवतारात रसिकांच्या भेटीला येणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 11:50 IST

छोट्या पडद्यावरील ब-याच कलाकारांना आता नाटक, सिनेमा, मालिका, रियालिटी शो बरोबरच वेबसिरीजचीही भुरळ पडू लागली आहे. अनेक कलाकार विविध ...

छोट्या पडद्यावरील ब-याच कलाकारांना आता नाटक, सिनेमा, मालिका, रियालिटी शो बरोबरच वेबसिरीजचीही भुरळ पडू लागली आहे. अनेक कलाकार विविध वेबसिरीजच्या माध्यमातून रसिकांचं मनोरंजन करत आहेत. मराठीत कास्टिंग काऊट, स्ट्रगलर साला यासारख्या इतर वेबसिरीजनी रसिकांची मनं जिंकली आहेत.वेबसिरीजला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. हेच पाहून कलाकारही वेबसिरीजमध्ये हजेरी लावताना दिसत आहे. या कलाकारांच्या यादीत आता खुलता कळी खुलेना या मालिकेतील मोनिका म्हणजेच अभिज्ञा भावे हिचे नावसुद्धा जोडलं गेले आहे. मोनिका म्हणजेच अभिज्ञा आता एका वेबसिरीजमध्ये झळकणार आहे.मुव्हिंग आऊट नावाची एक हटके वेबसिरीज लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. 22 ऑगस्टपासून ही वेबसिरीज रसिकांना पाहता येणार आहे. नुकतंच या वेबसिरीजचं पोस्टर रिलीज झालं आहे. या वेबसिरीजची आणखी एक खासियत म्हणजे यांत छोट्या पडद्यावरील मोनिका म्हणजेच अभिनेत्री अभिज्ञा भावे झळकणार आहे. खुद्द अभिज्ञा भावेने सोशल मीडियावर आपल्या या नव्या प्रोजेक्टची माहिती रसिकांसह शेअर केली आहे.लग्नाच्या वयात आलेल्या मुलीसाठी तिचे पालक वरसंशोधन करतात त्यावेळी मुलगी कोणत्या मानसिकतेतून जात असते यावर आधारित ही वेबसिरीज आहे. मुलीच्या लग्नसाठी स्थळ शोधण्याची प्रक्रिया, त्यावेळी मुलीच्या मनातील भावना याची गुंतागुंत या वेबसिरीजमधून रसिकांना पाहता येणार आहे. सध्या खुलता कळी खुलेना या मालिकेत अभिज्ञा मोनिका ही भूमिका साकारत आहे. वेबसिरीजच्या पोस्टरवर अभिज्ञाचा आगळावेगळा आणि तितकाच हटके लूक पाहायला मिळत आहे. यांत ती मॉर्डन अवतारात रसिकांच्या भेटीला येणार आहे.मालिकेत तिची भूमिका निगेटिव्ह असली तरी ती रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. आता मुव्हिंग आऊट या वेबसिरीजच्या माध्यमातून अभिज्ञा आणखी एका वेगळ्या भूमिकेत रसिकांच्या भेटीला येणार आहे. छोट्या पडद्यावर त्याच त्या टिपिकल मालिका, तीच भांडणं, तेच रियालिटी आणि कॉमेडी शो पाहून कंटाळला असाल तर ही आगामी मुव्हिंग आऊट नावाची ही वेबसिरीज तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरु शकते.