Join us  

मोहित रैना आणि मुकुल देव यांनी दिली गोल्डन टेम्पलला भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 10:50 AM

डिस्कव्हरी जीत वाहिनीवर २१ सरफरोशः सारागाऱ्ही १८९७ ही मालिका लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेमध्ये हवालदार ईशर सिंगची ...

डिस्कव्हरी जीत वाहिनीवर २१ सरफरोशः सारागाऱ्ही १८९७ ही मालिका लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेमध्ये हवालदार ईशर सिंगची भूमिका मोहित रैना तर गुल बादशाहची भूमिका अभिनेता मुकुल देव साकारत आहे. २१ सरफरोशः सारागाऱ्ही १८९७ ही मालिका ब्रिटिश इंडियन आर्मीच्या ३६ व्या सीख रेजिमेंटमधील २१ धैर्यशाली सैनिकांच्या वास्तविक आयुष्यावरून प्रेरणा घेऊन बनवण्यात आली आहे. ही मालिका १२ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेच्या यशासाठी नुकतीच मोहित आणि मुकुलने गोल्डन टेम्पलला भेट देऊन प्रार्थना केली. काँटिलो पिक्चर्स प्रा.लि.ची निर्मिती असलेल्या या मालिकेत मुकुल मोहित रैना नायक हवालदार ईशर सिंगच्या तर मुकुल देव खलनायक गुल बादशाहच्या भूमिकेत दिसणार आहेत तर ल्यूक केनी मेजर डेज वोक्सची भूमिका साकारणार आहे. गोल्डन टेम्पलला जाऊन मोहित रैनाला खूपच प्रसन्न वाटले. याविषयी तो सांगतो, “गोल्डन टेम्पलला भेट देताना मला खरंच खूप आनंद झाला होता. श्री दरबार साहिब येथे गुरुबानी ऐकण्याचा अनुभव खूपच छान होता. हा अनुभव शब्दांत मांडणे अशक्य आहे. मी देवों के देव महादेव या भूमिकेत महादेवाची भूमिका साकारली होती. त्यावेळी माझी अध्यात्माशी जवळून ओळख झाली. जर तुम्ही शुद्ध मनाने काही इच्छा व्यक्त केलीत तर परमेश्वर ती नक्कीच ऐकतो असे माझे म्हणणे आहे. मी गोल्डन टेम्पलमध्ये जाऊन या मालिकेविषयी प्रार्थना केली. या मालिकेसाठी मी खूप मेहनत घेतली आहे. या मालिकेतील माझी भूमिका प्रेक्षकांना आवडेल अशी मला आशा आहे.” गोल्डन टेम्पलला गेल्यानंतर  मुकुल देवच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. तो सांगतो, “श्री हरमंदिर साहिब, सरोवर येथील शांतता हा एक स्वर्गीय अनुभव असून तो तुम्हाला तुमच्या मनात खूप खोलवर घेऊन जातो. मला आठवतंय मी माझ्या वडिलांसोबत पहिल्यांदा गोल्डन टेम्पलला गेलो होतो. आजही ती आठवण माझ्या मनात ताजी आहे. त्यानंतर मी अनेकदा इथे आलो आहे आणि प्रत्येक वेळेला नवीन अनुभव आणि नवी शिकवण घेऊन परतलो आहे.”Also Read : मोहित रैना आणि मुकुल देवने भारतीय सैनिकांसोबत मारल्या गप्पा