Join us  

‘झगा’ मगा सर्वांनी मला बगा...! मराठीतला ‘रणवीर सिंग’ अभिजीत खांडकेकरचा अतरंगी लुक बघाच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 11:03 AM

Abhijeet Khandkekar New Look : ‘माझ्या नव-याची बायको’ फेम अभिनेता अभिजीत खांडकेकर त्याच्या अतरंगी लुकमुळे चांगलाच चर्चेत आला आहे.

ठळक मुद्दे काही दिवसांपूर्वी अभिजीतने पारंपरिक साडीपासून तयार केलेला पोशाख परिधान करत एक लांबलचक पोस्ट टाकली होती.

मराठी चित्रपटसृष्टीतील तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका अभिनेता अभिजीत खांडकेकर (Abhijeet Khandkekar) सध्या जाम चर्चेत आहे. होय, त्याच्या हटके लुकची सध्या सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा रंगलीये. अभिजीतचा हा लुक पाहून चाहत्यांना हटकून रणवीर सिंगची आठवण होतेय.रणवीर सिंग त्याच्या चित्रविचित्र फॅशन व कपड्यांसाठी ओळखला जातो. अनेकदा त्याची यावरून खिल्लीही उडवली जाते. पण जगाची पर्वा करतंय कोण? आता हाच अ‍ॅटिट्यूड अभिजीत खांडकेकरने दाखवला आहे. त्याने एक झक्कास लुक शेअर केला आहे.

या फोटोत अभिजीतने एक रंगीबेरंगी जर्किन घातला आहे. त्याच्याखाली त्याने मुलींच्या प्लाजोला मिळतीजुळती पॅन्ट परिधान केली आहे. अनेकांना अभिजीतचा हा लुक जाम आवडला आहे. पण अनेक नेटक-यांनी यावरून अभिजीतची मजा घेतली आहे. शिवाय त्याची तुलना चक्क रणवीर सिंगशी केली आहे.  

अजून एक नमुना, मराठीतला रणवीर सिंग अशा कमेंट्स युजर्सनी दिल्या आहेत. एका युजरने ‘झगा, मगा सर्वांनी मला बघा,’ अशी मजेशीर कमेंट लिहिली आहे. एका युजरने चक्क रणवीरसारखा अतरंंगी होऊ नकोस, नाहीतर पोरी तुझ्याकडे बघण थांबवतील, असा सल्ला दिला आहे. एका युजरने रणवीर सिंग अंगात घुसलाय का? अशा शब्दांत अभिजीतची खिल्ली उडवली आहे.

एकंदर काय तर ‘माझ्या नव-याची बायको’ फेम अभिनेता अभिजीत खांडकेकर त्याच्या अतरंगी लुकमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी अभिजीतने पारंपरिक साडीपासून तयार केलेला पोशाख परिधान करत एक लांबलचक पोस्ट टाकली होती. तसेच स्त्री आणि पुरुषांचे कपडे विभागू नयेत असे मतही व्यक्त केले होते.  

टॅग्स :अभिजीत खांडकेकर