कमालिका बनणार गुरू माँ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 14:53 IST
क्योंकी साँस भी कभी बहु थी, नागिन यांसारख्या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारणारी कमालिका गुहा ठाकूरता ही एक चांगली अभिनेत्री ...
कमालिका बनणार गुरू माँ
क्योंकी साँस भी कभी बहु थी, नागिन यांसारख्या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारणारी कमालिका गुहा ठाकूरता ही एक चांगली अभिनेत्री असली तरी ती अभिनयापेक्षाही तिच्या नृत्यासाठी अधिक ओळखली जाते. कमालिका आता एका मालिकेत नृत्यशिक्षिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत नैरा आणि गयू या एका नृत्याच्या स्पर्धेत भाग घेणार आहेत आणि त्यासाठी त्यांना गुरू मैय्या म्हणजेच कमालिका परीक्षण देणार असल्याची चर्चा आहे. कमालिका ही तिच्या खऱ्या आयुष्यात खूप चांगली नर्तिका असल्याने या भूमिकेसाठी तिचा विचार करण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे.