Join us

मनिषची अयोद्धावारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2016 16:19 IST

नागार्जुन - एक योद्धा या मालिकेत मनिष वाधवा वासुकी ही भूमिका साकारत आहे. त्याने आतापर्यंत अनेक पौराणिक मालिकेत काम ...

नागार्जुन - एक योद्धा या मालिकेत मनिष वाधवा वासुकी ही भूमिका साकारत आहे. त्याने आतापर्यंत अनेक पौराणिक मालिकेत काम केले आहे. तो त्याच्या खऱ्या आयुष्यातही अतिशय स्पिरिच्युअल आहे. तो नुकताच स्वच्छ भारत अभिनयाना अंतर्गत बनवल्या जाणाऱ्या एका लघुपटाच्या चित्रीकरणासाठी गेला होता. या लघुपटाच्या चित्रीकरणाचा अनुभव खूपच चांगला असल्याचे तो सांगतो. चित्रीकरण संपल्यावर त्याने तिथे देवदर्शनदेखील केले. तिथे काही दिवस राहाण्याचाही त्याचा विचार होता. पण कामाला पहिली पसंती दिली पाहिजे असा विचार करून तो चित्रीकरणाच्या दुसऱ्याच दिवशीच नागार्जुन या मालिकेच्या सेटवर पोहोचला.