Join us  

'मैंने प्यार किया' फेम भाग्यश्रीची लेक दिसायला आहे तिच्या सारखीच सुंदर, नुकतीच केली बॉलिवूडमध्ये एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 3:51 PM

Bhagyashree : 'मैने प्यार किया' फेम भाग्यश्रीच्या लेकीने आईच्या पावलांवर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.

'मैने प्यार किया' फेम भाग्यश्री (Bhagyashree)ची मुलगी अवंतिका दासानी(Avantika Dasani)ने आईच्या पावलांवर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. इतकेच नाही आईप्रमाणे लेकदेखील खूप सुंदर दिसते. अवंतिकाने रोहन सिप्पीच्या सायकोलॉजिकल थ्रिलर-ड्रामा सीरिज 'मिथ्या'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या सीरिजमधून निर्मात्यांनी अवंतिकाला लाँच केले आहे. या पोस्टरमध्ये तरुण अभिनेत्री अवंतिका बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीसोबत दिसत आहे.

यापूर्वी, भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू याने २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेल्या 'मर्द को दर्द नहीं होता' या चित्रपटाद्वारे सिनेइंडस्ट्रीत एन्ट्री केली आहे. त्यानंतर आता भाग्यश्रीची मुलगी अवंतिका ग्लॅमरच्या जगात आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाली आहे. रिलीज झालेल्या मिथ्याच्या पोस्टरमध्ये, अवंतिका दासानीचा इंटेस लूक दिसतो आहे. जो एक प्रकारे या सायकॉलॉजिकल थ्रिलर-ड्रामाची डार्क आणि वेधक बाजू प्रेक्षकांसमोर आणत आहे. दोन मुख्य महिलांची ट्विस्टेड कथा असून हटके आणि एक्सपेरिमेंटल प्रोजेक्टची अवंतिकाने निवड केली आहे.

या पहिल्या प्रोजेक्टबद्दल अवंतिका दासानी म्हणते की, “माझ्या पहिल्याच प्रयत्नात अशी आव्हानात्मक व्यक्तिरेखा आणि मनोरंजक कथानक साकारणे हा सर्वात मोठा थरार होता. इतक्या प्रतिभावान आणि अविश्वसनीय कलाकारांसह. काम करण्याची संधी मिळाल्यामुळे मी खूप आभारी आहे. त्यांनी माझ्यासारख्या नवोदितांचे मनापासून स्वागत केले आहे. मला आशा आहे की प्रेक्षकांना मिथ्या पाहण्यात जितका आनंद येईल तितकाच आनंद आम्ही बनवताना घेतला आहे." अवंतिकासोबत मिथ्या या सीरिजमध्ये हुमा कुरेशी आणि परमब्रता प्रमुख भूमिकेत आहेत. ही सीरिज झी ५वर पाहायला मिळेल.

टॅग्स :भाग्यश्री