Join us  

'महाराष्ट्रातील हास्यजत्रा'मधील या अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो चर्चेत, नेटकरी म्हणताहेत - 'हा तर विराट कोहली!'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2023 12:27 PM

Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीने नुकतेच सोशल मीडियावर बालपणीचे काही फोटो शेअर केले आहेत. जे व्हायरल होताना दिसत आहेत.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’(Maharashtrachi Hasyajatra)मधून अभिनेत्री नम्रता संभेराव (Namrata Sambherao) घराघरात पोहचली आहे. तिच्या विनोदी शैलीचे असंख्य चाहते आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमध्ये नम्रता साकारत असलेले प्रत्येक पात्र प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडते. नुकतेच तिने सोशल मीडियावर तिच्या बालपणीचे फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांना थेट विराट कोहलीच आठवला आहे.

अभिनेत्री नम्रता संभेरावने नुकतेच सोशल मीडियावर तिचे बालपणीचे काही फोटो शेअर केले आहेत. सध्या मराठी सिनेसृष्टीत एक ट्रेंड वायरल होऊ लागला आहे तो म्हणजे त्यांचे २५ वर्ष जुने फोटो पोस्ट करण्याचा. याच ट्रेंडला फॉलो करत नम्रताने देखील तिचे काही जुने फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

नम्रताने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती अगदी चार-पाच वर्षांची दिसत आहे. केसांचा बॉयकट, मोठे व बोलके डोळे, कपाळावर टिकली आणि सुंदर पारंपारिक ड्रेस परिधान करून ती फोटोंसाठी पोज देताना दिसत आहे. या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ या मालिकेमुळे आम्हांला आणि तुम्हांलाही नव्वदच्या काळात नेले तर हा आहे माझा १९९७ मधील फोटो. तुम्हीही तुमचा १९९७ मधील फोटो पोस्ट करा सोनी मराठी वाहिनीला टॅग करा आणि #PostOfficeUghadAahe हा हॅशटॅग वापरा. २ एप्रिल, रविवार रात्री ९ वाजता चुकवू नका ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’चा शेवटचा भाग.

पण तिचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांना विराट कोहलीची आठवण झाली. विराट कोहली देखील लहानपणी असाच दिसायचा असा अनेकांनी कमेंट करत म्हटले. एका युजरने लिहिले, विराट कोहली, तर दुसरा युजर म्हणाला, मला आज समजले पावली लवली कोहली स्केट तू का करतेस. तू सेम विराट कोहली सारखीच दिसायचीस. तर आणखी एकाने लिहिले की, हा तर विराट कोहली! त्यामुळे आता नम्रताचे हे फोटो खूप चर्चेत आले आहेत. तर अनेकांनी ती खूप छान आणि क्युट दिसायची असेही म्हटले आहे.

टॅग्स :नम्रता आवटे संभेराव