Join us

सुव्रत बनला जादूगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2016 05:45 IST

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेने तरूणांच्या मनावर राज्य केले आहे. याच मालिकेतील सुयश म्हणजेच सुव्रत जोशी याला आपण खूप ...

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेने तरूणांच्या मनावर राज्य केले आहे. याच मालिकेतील सुयश म्हणजेच सुव्रत जोशी याला आपण खूप हुशार, विचारशील, शांत,नम्र व अभ्यासू भूमिकेत पाहिले आहे. जर हाच सुव्रत  जादूगार आहे हे सांगितले तर आश्चर्य वाटून घेवू नका. कारण हे आम्ही सांगत नाही तर स्वत: खुद्द तरूणांची लाडकी रेश्मा म्हणजेच सखी गोखले सांगत आहे. ती म्हणते, मी सुव्रतला चांगली ओळखते. आमची मैत्री खूप छान आहे. तो एक चांगला माणूस आहे. त्याचबरोबर तो एक उत्तम कलाकार असून त्यांची जादूची कला मी पाहिली आहे.तो माझा कणा आहे.चला तर पाहूयात, सखीने सोशलमिडीयावर शेअर केलेला सुव्रत जोशीची जादूची कला.