Join us  

"मेकअपरूममध्ये बंद केले आणि....", अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली - असुरक्षित वाटतंय...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 10:29 AM

अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मालिकेच्या सेटवर आलेला धक्कादायक अनुभव शेअर केला आहे.

'ये है मोहब्बतें'मधून अभिनेत्री कृष्णा मुखर्जी (Krishna Mukherjee) घराघरात पोहचली. या मालिकेनंतर शेवटची ती 'शुभ शगुन' मालिकेत शेहजादा धामीसोबत झळकली होती. दरम्यान अलिकडेच कृष्णा मुखर्जीने मालिकेच्या निर्मात्यांवर काही गंभीर आरोप केले आहेत. 'शुभ शगुन'चे शूटिंग पूर्ण केल्यानंतर अभिनेत्री रजेवर आहे. नुकतेच कृष्णाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जाऊन 'शुभ शगुन'च्या सेटवरील अनुभवाबद्दल धक्कादायक माहिती दिली होती. शोच्या निर्मात्याकडून होणाऱ्या त्रासामुळे ती नैराश्य आणि चिंतेने ग्रस्त असल्याचे तिने सांगितले.

एवढेच नाही तर तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये अभिनेत्रीने धक्कादायक गोष्टी शेअर केल्या आहेत. तिने पोस्टमध्ये खुलासा केला की ती आजारी असताना तिला मेकअप रूममध्ये बंद करण्यात आले होते आणि पाच महिन्यांपासून पगार मिळाला नाहीये. तिला निर्मात्याकडून धमक्याही आल्या, ज्यामुळे ती बोलायला घाबरली. असे प्रकार पुन्हा घडू शकतात या भीतीने ती नवीन प्रोजेक्ट्स स्वीकारायला घाबरत आहे.

माझ्या आयुष्यातला हा वाईट निर्णय - कृष्णा मुखर्जीकृष्णाने एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, 'माझ्या भावना व्यक्त करण्याचे धाडस माझ्यात कधीच नव्हते, पण आज मी ठरवले आहे की यापुढे मी ते माझ्या मनात ठेवणार नाही. मी एका कठीण टप्प्यातून जात आहे आणि गेले दीड वर्ष माझ्यासाठी अजिबात सोपे नव्हते. मी दु:खी आहे, अस्वस्थ आहे आणि जेव्हा मी एकटी असतो तेव्हा माझे मन ओरडते. जेव्हा मी दंगल टीव्हीसाठी शुभ शगुन हा माझा शेवटचा शो सुरू केला तेव्हापासून हे सर्व सुरू झाले. हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट निर्णय होता.

सेटवर देण्यात आला त्रासकृष्णा पुढे म्हणाली की, 'मला ही मालिका अजिबात करायची नव्हती, पण मी इतरांचे ऐकले आणि कॉन्ट्रॅक्ट साइन केले. प्रोडक्शन हाऊस आणि निर्माता कुंदन सिंग यांनी मला अनेकदा त्रास दिला आहे. एकदा त्यांनी मला माझ्या मेकअप रूममध्ये बंद केले कारण मी आजारी होते आणि शूट न करण्याचा निर्णय घेतला होता. कारण ते मला माझ्या कामाची फी देत ​​नव्हते आणि मी आजारी असताना आणि आत असताना ते माझ्या मेकअप रूमचे दार वाजवत होते की जणू ते तोडतील, तेही मी आत कपडे बदलत असताना.'

५ महिन्यांपासून मिळाले नाहीत पैसेकृष्णा मुखर्जीने पुढे लिहिले की, 'त्यांनी मला पाच महिन्यांपासून पैसे दिलेले नाहीत. ही खरोखरच खूप मोठी रक्कम आहे. मी प्रॉडक्शन हाऊस आणि दंगलच्या ऑफिसमध्ये गेले आहे पण त्यांनी मला कधीच उत्तर दिले नाही. होय, अनेकवेळा धमक्या दिल्या गेल्या. संपूर्ण वेळ मला असुरक्षित, कोलमडलेले आणि भीती वाटली. मला असुरक्षित वाटत आहे, मी अनेकांना मदतीसाठी विचारले पण काहीही झाले नाही. या प्रकरणात कोणीही काहीही करू शकत नव्हते. लोक मला विचारतात की मी मालिकेत का काम करत नाही? हे कारण आहे. मला भीती वाटते की तीच घटना पुन्हा घडली तर? मला न्याय हवा आहे.

कृष्णा मुखर्जीच्या कुटुंबात भीतीचं वातावरणकृष्णाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हे लिहिताना माझे हात अजूनही थरथरत आहेत पण मला लिहावे लागले. यामुळे मी चिंता आणि नैराश्यात झुंजत आहे. आम्ही आमच्या भावना लपवतो आणि सोशल मीडियावर चांगली बाजू दाखवतो. पण हे वास्तव आहे. माझे कुटुंब मला पोस्ट करू नका असे सांगत होते कारण ते सर्व अजूनही घाबरलेले आहेत जर या लोकांनी तुमचे नुकसान केले तर? पण मी का घाबरू? हा माझा हक्क आहे आणि मला न्याय हवा आहे.

कृष्णा मुखर्जीला मिळतोय कलाकारांचा पाठिंबाछोट्या पडद्यावरील अनेक कलाकारांनी पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त करत कृष्णाला सांगितले की ते तिच्यासोबत आहेत. पवित्रा पुनियाने लिहिले, 'आम्ही इथेच आहोत.' राजीव अडातिया म्हणाले, 'तुला आणखी धैर्य मिळो.' अभिनेते अद्विक महाजन म्हणाला, 'तू जे अनुभवले ते खूप त्रासदायक आहे. यावर कडक कारवाई करायला हवी. तुम्ही खंबीर राहा. आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत. याशिवाय अदिती भाटिया, श्रद्धा आर्य, निशा रावल, प्रणिता पंडित, अविनाश मिश्रा या कलाकारांनी तिला पाठिंबा दिला आहे.