Join us

कुमकुम भाग्यमध्ये येणार वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2016 13:16 IST

कुमकुम भाग्य या मालिकेतील प्रग्या आणि अभिची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडते. पण या मालिकेच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. ...

कुमकुम भाग्य या मालिकेतील प्रग्या आणि अभिची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडते. पण या मालिकेच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. या मालिकेला आता एक वेगळे वळण मिळणार आहे. मालिकेत अभिची भूमिका साकारणाऱ्या शब्बीर आहुवालियाचा स्मृतीभ्रंश होणार आहे. अभि प्रग्याला संपूर्णपणे विसरून जाणार आहे. अभिच्या गाडीला अपघात झाल्याने तो त्याच्या आयुष्यातील काही वर्षं विसरणार आहे. अभि काही वर्षं मागे गेल्यामुळे तो पूर्वीप्रमाणे स्वतःला मोठा रॉकस्टार समजणार आहे. तसेच तो तनूला आपली प्रेयसी समजणार आहे. मालिकेला मिळालेले हे नवे वळण प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असे शब्बीर आहुवालिया सांगतो.