Join us  

अपघातातून सावरतेय पूजा बॅनर्जी, नियमित योगाभ्यास केल्यामुळेच झाली ठणठणीत बरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 5:24 PM

पूजा बॅनर्जीला चित्रीकरणाच्या वेळी हाताने वस्तू उचलणं आणि पकडून ठेवणं जमत नव्हतं. 

‘झी टीव्ही’वरील ‘कुमकुम भाग्य’ मालिकेची मन गुंतवून ठेवणारी कथा आणि अभी (शब्बीर अहलुवालिया), प्रज्ञा (श्रुती झा), रिया (पूजा बॅनर्जी), प्राची (मुग्धा चापेकर) आणि रणबीर (कृष्ण कौल) यासारख्या व्यक्तिरेखांचे केलेले सहजसुंदर चित्रण यामुळे ही मालिका गेली अनेक वर्षे प्रेक्षकांची अतिशय आवडती मालिका राहिली आहे. 

 

सध्याच्या या कोविड विषाणू साथीच्या काळात मालिकेतील सर्व कलाकार हे समाजात सकारात्मकता संदेश देण्याचाच प्रयत्न करत आहेत. किंबहुना त्यातील पूजा बॅनर्जी ही अभिनेत्री तर सतत प्रेरणादायक संदेश साकारात्मक ऊर्जा देण्याचा प्रयत्न करते. पुजाचा मोठा अपघात झाला होता. हळूहळू पूजा अपघातातून सावरतेय. पूजाने आता योगसाधना  सुरू केली आहे. तिने आपल्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवरून आपली ही कथा आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचविली आहे.

अनेकांना ही गोष्ट ठाऊक नसेल, पण काही वर्षांपूर्वी पूजा बॅनर्जी एका मोठ्या अपघातातून बचावली असली, तरी तिच्या हाताची बरीच हाडे मोडल्याने तिला अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या आहेत. या अपघातामुळे आपल्याला आता आपले नेहमीचे आयुष्य पूर्वीसारखे जगता येईल, ही आशाच पूजाने गमावली होती, पण तरीही तिने धीर न सोडता सतत प्रयत्न करून आणि निर्धारपूर्वक उपाय योजून हाताच्या हालचाली पुन्हा सुरू करण्यात यश मिळविले होते.

तो अनुभव आणि सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना पूजा बॅनर्जी म्हणाली, “एका रिएलिटी कार्यक्रमात काम करताना मला सेटवरच तो अपघात झाला होता. त्यात माझ्या हाताची बरीच हाडे मोडली होती. त्यामुळे मला शस्त्रक्रिया करावी लागली आणि डॉक्टरांनी माझ्या हातात दोन सळया आणि आठ स्क्रू बसविले होते. मला त्याचा इतका भयंकर त्रास होत होता की मला माझे हात हलवणेही शक्य नव्हते. माझं आयुष्य पूर्वीसारखं जगता येणारच नाही, अशीच भीती मला वाटत होती.

 काही महिन्यांपूर्वी जेव्हा मी कुमकुम भाग्यसाठी चित्रीकरण करण्यास सुरुवात केली , तेव्हाही मला माझ्या हातांची सामान्य हालचाल करता येत नव्हती. मी तेव्हा या अपघातातून बाहेर येत होते आणि माझ्या अंगात पुन्हा ताकद निर्माण होऊ लागली होती. तरीही मला चित्रीकरणाच्या वेळी त्या हाताने वस्तू उचलणं आणि पकडून ठेवणं जमत नव्हतं. 

पण अत्यंत निर्धारपूर्वक मी त्यासाठी कठोर परिश्रम घेतले आणि हातांना विश्रांती दिली, त्यामुळे आता मला माझ्या उजव्या हाताच्या जवळपास 85 टक्के, तर डाव्या हाताच्या सुमारे 100 टक्के नैसर्गिक हालचाली करणं जमू लागलं आहे. या सर्व काळात मला आधार देऊन माझी देखरेख केल्याबद्दल मी माझे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि डॉक्टरांची अतिशय आभारी असून त्यांच्यामुळेच मी या मोठ्या अपघातातून बाहेर पडू शकले. मी आता या दुखापतीतून जवळपास पूर्णपणे बाहेर पडले असले, तरी मला अजून काही पावलं उचलावी लागणार आहेत. योगामुळेच आपण पूर्णपणे ठणठणीत बरे झाल्याचे पूजा सांगते.

टॅग्स :पूजा बॅनर्जी