Join us  

मामा-मामीवर खूप प्रेम करतो, माफी मागतो...; गोविंदासोबतच्या भांडणावर बोलला कृष्णा अभिषेक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 10:51 AM

गोविंदा आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक यांच्यातील जुना वाद अद्यापही संपलेला नाही. आता या संपूर्ण एपिसोडवर कृष्णाची प्रतिक्रिया आली आहे.

ठळक मुद्दे ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सुनीता कृष्णावर बरसल्या होत्या.

गोविंदा (Govinda) आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek ) यांच्यातील जुना वाद अद्यापही संपलेला नाही. अलीकडे हा वाद नव्यानं उफाळून आला. गोविंदा व त्याची पत्नी सुनीता ‘द कपिल शर्मा शो’मध्ये येणार म्हटल्यावर, कृष्णाने हा एपिसोड करण्यास स्पष्ट नकार दिला. गेल्या वषीर्देखील जेव्हा गोविंदाने कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. त्या एपिसोडमध्ये कृष्णा दिसला नव्हता. कृष्णाच्या या वागण्यानं मामी सुनीता (Sunita Ahuja) जाम भडकली आणि यापुढे मला त्याचं थोबाडंही पाहायचं नाही, असं म्हणून तिनं आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. आता या संपूर्ण एपिसोडवर कृष्णाची प्रतिक्रिया आली आहे.

मामीच्या बोलण्यानं कृष्णा दुखावला आहे. माझे मामा-मामी माझ्यावर का नाराज आहेत,हेच त्याला कळेनासं झालं आहे. कृष्णा म्हणाला, ‘मामी माझ्याबद्दल खूप काही बोलली आहे. निश्चितपणे मला वाईट वाटलं. पण कदाचित मामी माझ्यावर खूप प्रेम करते आणि म्हणूनच ती माझ्यावर रागावलीये. आता तिला माझं थोबाडंही पाहायचं नाहीये, यावरून ती माझ्यावर किती रागावलीये, हे दिसतं. तुम्ही ज्यांच्यावर खूप प्रेम करता, त्यांच्यावरच जास्त रागावता. आईवडिल आपल्या मुलांवर रागावतात, तेव्हा ते असेच बोलतात. मी माझ्या मामा-मामीवर खूप प्रेम करतो. मी त्यांची माफी मागू इच्छितो. मी अनेकदा प्रयत्न केला, पण त्यांनी माझी माफी स्वीकारली नाही. ते मला का माफ करू इच्छित नाहीत, हे कळतं नाही. मी तर त्यांच्या मुलासारखा आहे. आमच्यात जे काही मतभेद आहेत, ते मी दूर करू इच्छितो, हे मी अनेक मुलाखतीत सांगितलं आहे. पण तरिही भांडण सुरूच आहे. मामी माझ्याबद्दल बोलली ते सगळे फिल्मी शब्द आहेत. हे शब्द चित्रपटात वापरले जातात, खºया आयुष्यात नाही. मामा-मामी मला आईवडिलांसारखे आहेत.’

काय म्हणाल्या होत्या सुनीता? ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सुनीता कृष्णावर बरसल्या होत्या.  ‘जेव्हा जेव्हा आम्ही शोमध्ये येतो, तेव्हा तो प्रसिद्धीसाठी माध्यमांमध्ये आमच्याबद्दल काही ना काही बोलतो. हे सगळं करूण काय फायदा? घरातल्या गोष्टी लोकांसमोर आणण्यात काही अर्थ नाही. गोविंदा यावर काही बोलू किंवा प्रतिक्रिया देऊ शकत नाही पण यामुळे मला खूप राग येतो. कृष्णाकडे कॉमेडीची प्रतिभा ही फक्त त्याच्या मामा गोविंदाचं नाव घेण्यापुरती मर्यादित आहे. मला यापुढे त्याचं तोंडही पाहायचं नाही, असं सुनीता म्हणाल्या होत्या.

टॅग्स :गोविंदाकृष्णा अभिषेक