Join us  

‘नट्टू काका’च्या रोलसाठी घनश्याम नायक यांना मिळते इतके मानधन, अखेरच्या श्वासापर्यंत काम करत राहण्याची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2021 5:19 PM

मालिकेतील इतर पात्रांप्रमाणे नट्टु काका ही भूमिकाही तितकीच रंजक आहे. इतर भूमिकेप्रमाणे नट्टु काकाही तितकेच लोकप्रिय आहे.

छोट्या पडद्यावरील रसिकांची आवडती मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा. गेल्या अनेक वर्षापासून ही मालिका आणि मालिकेतल्या व्यक्तीरेखा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. यातील प्रत्येक पात्र विशेष आहे, मात्र रसिकांची आवडती जोडी ठरली ती जेठालाल आणि दया. या दोघांच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. त्यामुळे दोघांची एकत्र धमाल रसिकांना पाहायची जणू काही सवयच झाली. मात्र  मालिकेतील इतर पात्रांप्रमाणे नट्टु काका ही भूमिकाही तितकीच रंजक आहे.

 

इतर भूमिकेप्रमाणे नट्टु काकाही तितकेच लोकप्रिय आहे. मालिकेत  प्रत्येक कलाकाराला त्यांच्या क्षमतेनुसार मानधन मिळत आहे. नट्टु काकांनाही प्रत्येक एपिसोडप्रमाणे ३० हजार रु. इतके मानधन मिळते. आज नट्टू काका घराघरात लोकप्रिय आहेत. मात्र जेव्हा त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले तेव्हा मात्र काळ वेगळा होता. कामाप्रमाणे मोबदला कलाकारांना मिळत नव्हता. 

२४ तास काम करुनही केवळ ३ रु. इतकीच त्यांची कमाई असायची. त्यात कुटुंबाची जबाबदारी. आर्थिक संकट आले तरीह घनश्याम नायक यांनी हार मानली नाही. मिळालेली संधीचे सोनं करत गेले, मिळेत ते काम करत राहिले. त्यामुळेच आज त्यांनी केलेला संघर्षाचे फळ त्यांना मिळाल्याचे ते सांगतात. आज नट्टु काका म्हणजेच घनश्याम नायक यांची मुंबईत दोन घरं आहेत. शेवटच्या श्वासापपर्यंत काम करत राहण्याची नट्टु काका यांची इच्छा आहे. इतकेच नाही तर तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेमुळे आज घनश्या नायक यांना पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळाली आहे. त्यामुळे आयुष्याचा अंतही याच मालिकेच्या सेटवर व्हावा आणि चेह-याला मेकअप असावा अशीही इच्छा नट्टु काकांनी बोलून दाखवली आहे. 

'तारक मेहता'च्या दया बेन भूमिकेसाठी ‘या’ अभिनेत्रीची वर्णी लागण्याची शक्यता, जाणून घ्या कोण आहे 'ती'?

राखी विजान मालिकेत दया बेनच्या भूमिकेत झळकू शकते. राखी विजानने दिलेल्या मुलाखतीत तिला दया बेन ही भूमिका साकारण्याची इच्छा असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अधिकृत घोषणे आधी राखीने चाहत्यांना दिलेले संकेत तर नाही ना असेच सा-यांना वाटत आहे.राखी विजानने दया बेन साकारण्याची इच्छा व्यक्त केलेली असली तरी मालिकेच्या निर्मांत्याकडून अजुनतरी कोणत्याही प्रकारेच स्पष्टीकरण आलेले नाही.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा