Join us  

मराठमोळा शिव ठाकरे चमकला! 'खतरों के खिलाडी १३' फायनलमध्ये धडक, वाचा टॉप ५ फायनलिस्टची यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 5:57 PM

Khataron Ke Khiladi 13 : 'खतरों के खिलाडी १३'ला टॉप ५ फायनलिस्ट मिळाले आहेत. या शोच्या टॉप ५ फायनलिस्टमध्ये मराठमोळ्या शिव ठाकरेने जागा मिळवली आहे. 

'खतरों के खिलाडी' हा अनेक रिएलिटी शोपैकी आवडता कार्यक्रम आहे. रोहित शेट्टी होस्ट करत असलेल्या या शोमध्ये टीव्हीवरील लखलखत्या दुनियेतील तारे अनेक खतरनाक स्टंट करताना दिसतात. या शोचं १३वं पर्व अंतिम टप्प्यात आलं आहे. 'खतरों के खिलाडी १३'ला टॉप ५ फायनलिस्ट मिळाले आहेत. या शोच्या टॉप ५ फायनलिस्टमध्ये मराठमोळ्या शिव ठाकरेने जागा मिळवली आहे. 

शिव ठाकरेबरोबरच 'खतरों के खिलाडी १३'च्या पर्वात एकूण १४ सेलिब्रिटी सहभागी झाले होते. भयानक स्टंट आणि अनेक अडथळे पार करत यातील पाच जणांनी फायनलमध्ये धडक मारली आहे. डिनो जेम्स, ऐश्वर्या शर्मा, अर्जित तनेजा, रश्मीत कौर आणि शिव ठाकरे हे खतरों के खिलाडी १३ चे टॉप ५ फायनलिस्ट ठरले आहेत. 'खतरों के खिलाडी १३' चा ग्रँड फिनाले १४ ऑक्टोबरला पार पडणार आहे. आता 'खतरों के खिलाडी १३'चा विजेता कोण ठरतं? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

दरम्यान, अनेक रिएलिटी शोमध्ये सहभाग घेतलेल्या शिव ठाकरेचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. शिवने 'रोडीज'मधून सगळ्यांची मनं जिंकून घेतली होती. त्यानंतर 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वाचा तो विजेता ठरला होता. 'बिग बॉस हिंदी'मध्येही शिव सहभागी झाला होता. 'बिग बॉस १६' चा शिव उपविजेता ठरला होता. 

टॅग्स :शीव ठाकरेखतरों के खिलाडी