Join us  

कौन बनेगा करोडपतीमधील एक करोडच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही स्पर्धक, पाहा तुम्हाला येते का उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 12:36 PM

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात शिवम यांनी ५० लाख रुपये जिंकले. पण एक करोड रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर त्यांना देता आले नाही.

ठळक मुद्देशिवकुमार यांनी कार्यक्रम सोडल्यानंतर अमिताभ यांनी या प्रश्नाचे अचूक उत्तर सांगितले. त्यांनी सांगितले की, योग्य उत्तर हे शिव प्रसाद चटर्जी असे आहे.

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या प्रत्येक सिझनला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळतो. अमिताभ बच्चन यांच्या सूत्रसंचालनाचे नेहमीच कौतुक केले जाते. या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना विविध प्रकारची माहिती देखील मिळते. या कार्यक्रमात कधी कोण करोडो रुपये जिंकतं तर कधी केवळ काही हजारांवर स्पर्धकाला समाधान मानावे लागते. 

कौन बनेगा करोडपतीमधील प्रश्नांची उत्तरं देताना अनेकवेळा स्पर्धकांच्या नाकी नऊ येतात. अनेक लाइफलाइन वापरून देखील खरे उत्तर काय असा प्रश्न स्पर्धकाला पडतो. या कार्यक्रमात नुकतीच उत्तर प्रदेशमधील शिवम राजपूतने हजेरी लावली होती. शिवम हे उत्तर प्रदेशमधील कानपूर येथील राहाणारे असून ते यूपी पॉवर कॉर्पोरेशनमध्ये क्लर्कचे काम करतात. त्यांनी या कार्यक्रमात गप्पा मारताना अमिताभ बच्चन यांना त्यांच्या संघर्षाविषयी सांगितले. शिवम यांनी त्यांच्या आयुष्यात खूप वाईट दिवस पाहिले आहेत. पण कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाने त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलले. 

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात शिवम यांनी ५० लाख रुपये जिंकले. पण एक करोड रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर त्यांना देता आले नाही. त्यामुळे त्यांना हा कार्यक्रम सोडावा लागला. शिवम यांना विचारण्यात आलेला हा प्रश्न असा होता की,मेघालय शब्द गढ़ने का श्रेय किसे दिया जाता है? A) बंकिम  चंद्र चटर्जी B) शिव प्रसाद चटर्जी C) राधानाथ सिकदर D) डॉरोथी मिडलटनशिवकुमार यांनी कार्यक्रम सोडल्यानंतर अमिताभ यांनी या प्रश्नाचे अचूक उत्तर सांगितले. त्यांनी सांगितले की, योग्य उत्तर हे शिव प्रसाद चटर्जी असे आहे.

 

टॅग्स :कौन बनेगा करोडपतीअमिताभ बच्चन