Join us  

कवी कुमार आझाद यांनी या दिवशी केले शेवटचे चित्रीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 11:39 AM

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील डॉ. हंसराज हाथी प्रेक्षकांचे प्रचंड लाडके होते. त्यांचे सही बात है असे बोलणे तर प्रेक्षकांना खूपच आवडायचे. प्रेक्षक आता त्यांच्या लाडक्या कवी कुमार आझाद यांना नक्कीच मिस करणार आहेत.

तारक मेहता का उल्टा चष्मा फेम डॉ हाथी म्हणजेच कवी कुमार आझाद यांनी 9 जुलैला मीरा रोड मधील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. हृदय विकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. कवी कुमार आझाद यांनी छोट्या पडद्याप्रमाणे मोठ्या पडद्यावर देखील काम केले होते. मेला या चित्रपटात आमिर खान सोबत ते झळकले होते. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत निर्मल सोनी डॉ. हाथची भूमिका साकारत होते. पण त्यांनी ही मालिका सोडल्यामुळे २००८ मध्ये कवी कुमार आझाद यांना या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. ते एक चांगले कलाकार असण्यासोबतच एक चांगले कवी होते.तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील डॉ. हंसराज हाथी प्रेक्षकांचे प्रचंड लाडके होते. त्यांचे सही बात है असे बोलणे तर प्रेक्षकांना खूपच आवडायचे. प्रेक्षक आता त्यांच्या लाडक्या कवी कुमार आझाद यांना नक्कीच मिस करणार आहेत. कवी कुमार आझाद यांनी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेसाठी 7 जुलैला शेवटचे चित्रीकरण केले. या दिवशी पुढील काही भागांसाठी देखील त्यांचे शॉर्ट घेण्यात आले होते. जणू काही कवी कुमार आझाद यांना त्यांच्या मृत्यूची चाहुल आधीच लागली होती. कारण त्यांनी निर्मात्यांना त्यांचे पुढील काही दिवसांचे देखील शॉर्ट त्याच दिवशी घेऊन ठेवायला सांगितले होते. कवी कुमार आझाद यांची तब्येत बरी नसल्याने ते चित्रीकरणासाठी येऊ शकणार नाहीत असे त्यांनी 9 जुलैला सकाळी मालिकेच्या टीमला कळवले होते. त्यांना सकाळ पासूनच अस्वस्थ वाटत होते. घरातच त्यांना हृदय विकाराचा धक्का आल्याने त्यांना नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले होते. पण रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या सेटवर 9 जुलैला सकाळी नेहमीप्रमाणेच चित्रीकरण सुरू होते. त्याचदरम्यान कवी कुमार आझाद यांचे निधन झाल्याची बातमी मालिकेच्या टीमला कळली. त्यांच्या निधनाने मालिकेच्या टीमला चांगलाच धक्का बसला. 

टॅग्स :कवी कुमार आझादतारक मेहता का उल्‍टा चश्‍मा