करण आणि अनुष्काचे मेकओव्हर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2016 13:09 IST
करण कुंद्रा आणि अनुष्का दांडेकर हे सध्या छोट्या पडद्यावरचे एक क्युट कपल मानले जाते. त्यांना अनेकवेळा एकमेकांसोबत वेळ घालवताना ...
करण आणि अनुष्काचे मेकओव्हर
करण कुंद्रा आणि अनुष्का दांडेकर हे सध्या छोट्या पडद्यावरचे एक क्युट कपल मानले जाते. त्यांना अनेकवेळा एकमेकांसोबत वेळ घालवताना पाहाण्यात येते. ये कहा आगये हम या मालिकेत करण प्रमुख भूमिका साकारत होता. या मालिकेच्या सेटवरही अनुष्का अनेकवेळा यायची. ही मालिका लवकरच संपणार असून या मालिकेचे करणने नुकतेच चित्रीकरण पूर्ण केले. या मालिकेनंतर करणने आता त्याचा लुक बदलायचे ठरवले आहे. त्याने नुकताच त्याचा मेकओव्हर केला आणि त्याची प्रेयसी अनुष्कानेदेखील त्याला या गोष्टीत साथ दिली. तिनेदेखील त्याच्यासारखाच लुक केलाय. करणने त्यांच्या या नव्या लुकचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.