Join us  

आता तुम्हीही द कपिल शर्मा शोच्या टीममध्ये होऊ शकता सहभागी, करा ही गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 5:19 PM

आता सामान्य लोकांना देखील द कपिल शर्मा शो मध्ये भाग घेण्याची संधी मिळणार आहे. कपिल शर्मानेच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट त्याच्या चाहत्यांना सांगितली आहे.

ठळक मुद्देआता एका अनोख्या आणि हटके पद्धतीने पुन्हा प्रेक्षकांना हसवण्यासाठी कपिल शर्मा सज्ज झाला आहे. विशेष बाब म्हणजे यंदाच्या शोमध्ये प्रेक्षकांना नवीन कलाकार पाहायला मिळणार आहेत.

बॉलिवूडचा प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माने 'द कपिल शर्मा शो'च्या माध्यमातून सर्वांना लोटपोट होऊन हसायला भाग पाडले होते. मात्र काही दिवसांसाठी कपिलचा शो ऑफ एअर गेला होता. मात्र आता एका अनोख्या आणि हटके पद्धतीने पुन्हा प्रेक्षकांना हसवण्यासाठी कपिल शर्मा सज्ज झाला आहे. विशेष बाब म्हणजे यंदाच्या शोमध्ये प्रेक्षकांना नवीन कलाकार पाहायला मिळणार आहेत.

इंडस्ट्रीतील काही नवीन कलाकारांचा द कपिल शर्मा शो मध्ये समावेश होणार आहे. त्याचसोबत आता सामान्य लोकांना देखील द कपिल शर्मा शो मध्ये भाग घेण्याची संधी मिळणार आहे. कपिल शर्मानेच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट त्याच्या चाहत्यांना सांगितली आहे. त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, द कपिल शर्मा शोची टीम चांगले लेखक आणि कलाकारांच्या शोधात आहे. तुम्ही देखील द कपिल शर्मा शोच्या माध्यमातून लोकांना खळखळून हसवू शकता... 

द कपिल शर्माच्या आधीच्या शोमध्ये कृष्णा अभिषेक, किकू शारदा, भारती सिंह, सुमोना चक्रवर्ती, चंदन प्रभाकर आणि अर्चना पूरन सिंग यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते.

कृष्णा अभिषेकने ईटाइम्सला सांगितले की, द कपिल शर्मा शोमध्ये मे मध्ये कमबॅक करणार आहे. अद्याप तारीख फायनल झालेली नाही. यावेळी शोमध्ये बऱ्याच नवीन गोष्टी पहायला मिळणार आहे. शोचा सेटदेखील नवीन असणार आहे.

कपिल शर्मा मागील लॉकडाउनमध्ये आपल्या चाहत्यांना खळखळून हसविले होते. शो बंद झाल्यानंतर चाहते खूप निराश झाले होते. कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी फेब्रुवारीत पुन्हा एकदा पालक झाले आहेत. गिन्नीने मुलाला जन्म दिला आहे. मागील वर्षी कपिलला मुलगी झाली होती. फॅमिलीसोबत वेळ व्यतित करण्यासाठी कपिलने ब्रेक घेतला होता.

टॅग्स :द कपिल शर्मा शोकपिल शर्मा