Join us  

कपिल शर्मा करतोय छोट्या पडद्यावर कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2018 5:48 AM

कॉमेडियन कपिल शर्माच्या फन्ससाठी एक खूषखबर आहे. मीडिया रिपोर्टनुसार कपिल शर्मा छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे.  यावेळी कपिल शर्मा ...

कॉमेडियन कपिल शर्माच्या फन्ससाठी एक खूषखबर आहे. मीडिया रिपोर्टनुसार कपिल शर्मा छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे.  यावेळी कपिल शर्मा सोनी टीव्हीवर दिसणार आहे. सोमवारी या शोचे प्रोमो शूट करणार आले आहे. या शोचे नाव अद्याप ठरवण्यात आलेले नाही. कपिलने द कपिल शर्मा शोच्या माध्यमातून  प्रेक्षकांचे या आधी मनोरंजन केले आहे.  त्याच्या या शोला प्रेक्षकांचादेखील चांगला प्रतिसाद लाभला होता. मात्र आजारपणामुळे काही काळ हा शो ऑफ एअर करण्यात आला होता. इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, सोनी टीव्ही आणि कपिल शर्माचा काही दिवसांपूर्वी मीटिंग झाली. ज्यात कपिलच्या कमबॅकबाबत चर्चा झाली आहे. कपिल आता एकदम फिट आहे आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करायला तयार आहे. क्रिएटिव्ह टीमकडून फायनल झाल्यानंतर शोचे शूट केले जाणार आहे. मार्चचा शेवटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.   गतवर्ष कपिलच्या करिअरच्या दृष्टीने फारसे चांगले राहिले नाही. वर्षाच्या सुरुवातीलाच कपिलच आणि सुनील ग्रोवरचे भांडण झाले. याचा फटका शोला बसला यानंतर वारंवार कपिलची तब्येत बिघडायला लागली त्यामुळे शोदेखील ऑफ एअर करण्यात आला. अनेक सेलिब्रेटींना कपिलच्या सेटवर येऊऩ शूटिंग न करताच परतावे लागले होते.  गतवर्षी आलेला कपिलचा ‘फिरंगी’ चित्रपट ही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. यात  बेहरामपुरिया गावात राहणाºया एका साध्याभोळ्या मंग्याची (मंगत्रम या नावाचे लघू रूप मंग्या, कपिलने ही भूमिका साकारली आहे.) कथा. स्वातंत्र्यापूर्वीची म्हणजे १९२० सालची कथा यात दाखवली आहे. महात्मा गांधी ब्रिटीशांविरूद्ध आंदोलन छेडत विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करतात. या आंदोलनाचा जोर वाढत असताच मंग्या नोकरीसाठी धडपडत असतो. अनेक प्रयत्न करूनही मंग्याला पोलिस दलात वा अन्य कुठेही नोकरी मिळत नाही. म्हणायला मंग्या बेरोजगार असतो. पण मंग्याच्या पायात मात्र चांगलाच दम असतो. पाठीदुखी असलेल्या कुणालाही बरे होण्यासाठी मंग्याची एक लाथ पुरेशी असते. कपिल शर्माच्या अभिनयाचा ओव्हर डोस या चित्रपटात होता.