Join us  

नवी मालिका ‘क्या हाल मिस्टर पांचाळ?’मध्ये कांचन गुप्ता आणि मणिंदर सिंह माय-लेकांच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2017 9:29 AM

‘क्या हाल मिस्टर पांचाळ?’ या मालिकेच्या आगळ्या वेगळ्या कथानकाबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूपच उत्सुकता निर्माण होऊ लागली आहे. परंतु या ...

‘क्या हाल मिस्टर पांचाळ?’ या मालिकेच्या आगळ्या वेगळ्या कथानकाबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूपच उत्सुकता निर्माण होऊ लागली आहे. परंतु या मालिकेत आई आणि मुलगा यांच्या प्रमुख भूमिका साकारणा-या कलाकारांना कसे करारबध्द करण्यात आले त्याची कथाही तितकीच रंजक आहे.निर्मात्यांनी या भूमिकांसाठी टीव्ही मालिकांतील प्रमुख कलाकारांना वगळून नाटकांतून प्रमुख भूमिका साकारणा-या कलाकारांची निवड करण्याचा निर्णय घेतला.नाटकांत काम करणा-या कलाकारांमुळे या मालिकेला एक वेगळेच रंजक रूप मिळेल, अशी निर्मात्यांची अपेक्षा होती. जेव्हा त्यांनी कांचन गुप्ता आणि मणिंदर सिंह यांची भूमिका पाहिली  तेव्हा त्यांनी त्या दोघांना तात्काळ 'कुंती देवी' आणि 'कन्हैय्या' या भूमिकांसाठी करारबध्द करण्यात आले.या भूमिका साकारताना या दोन्ही कलाकारांमधील सामंजस्य आणि नाते या मालिकेत स्पष्टपणे दिसून येते. आपल्या मुलाच्या पत्नीत पाच विशेष गुण असावेत, अशी इच्छा करणा-या आईची ही इच्छा पूर्ण होते खरी; पण तिला वेगळीच कलाटणी मिळते, तेव्हा काय घडते याचे चित्रण ‘क्या हाल मिस्टर पांचाळ?’ या मालिकेत विनोदी पध्दतीने मांडण्यात आले आहे.सुनेत पाच विशेष गुण हवे असणा-या सासूची इच्छा पूर्ण होते, पण तिला एका सुनेत हे गुणमिळण्याऐवजी प्रत्येक गुणाची एक अशा पाच सुना मिळतात. यासंदर्भात कांचन गुप्ता यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आपल्या मुलासाठी सर्वगुणसंपन्न पत्नीचा शोध घेणार्‍या कुंतीदेवी या सासूची भूमिका मी रंगवणार आहे.आपला मुलगा सर्वगुणसंपन्न असल्यामुळे त्याला बायकोही तशीच सर्वगुणसंपन्न मिळाली पाहिजे असा समज असलेल्या नेहमीच्या भारतीय सासूची ही कथा असून रंजक स्वरूपात सादर केली आहे. ही तशी नर्म विनोदी आणि सहज पटण्याजोगी कथा आहे आणि प्रेक्षकांना ती लगेच आपलीशीही वाटेल,याची मला खात्री आहे. निर्मात्यांनी या कथेद्वारे जो महत्त्वाचा संदेश सूचकपणे दिला आहे, ती गोष्ट मला फार आवडली.टीव्ही मालिकेत भूमिका करणं मला आवडलं आणि मी नाटकात भूमिका रंगविते त्यापेक्षा हे माध्यम नक्कीच वेगळं आहे.मणिंदर सिंह म्हणाला की, “रंगमंचापेक्षा हे माध्यम अगदीच भिन्न असून त्याचा प्रेक्षकवर्गही व्यापक आहे.त्यामुळे त्यांना काय वाटतं हे जाणून घेण्याची मला नक्कीच उत्सुकता आहे. मी यात कन्हैय्याची भूमिका साकारत असून तो एक यशस्वी सज्जन मुलगा आहे. असा मुलगा प्रत्येक मुलीला आपला पती म्हणून हवा असतो, असं मी समजतो. त्याला आपल्या आईला सर्व सुख द्यायचं असतं आणि त्यामुळेच आपल्या पत्नीच्या शोधाची जबाबदारी तो तिच्यावरच सोपवतो. त्याच्या आईला त्याच्यासाठी पाच विशेष गुणांनी परिपूर्ण अशी सून हवी असते. कांचन आणि अन्य कलाकारांबरोबर भूमिका साकारणं हा खूपच मजेदार अनुभव होता. नाटक किंवा मालिकांतील कामामुळे आम्ही अधिकच जवळ आलो. सेटवर शिकण्यासारखं खूप काही आहे. आता या मालिकेला कसा प्रतिसाद मिळतो, ते पाहायला मी उत्सुक आहे.”