Join us  

‘काळभैरव रहस्य-2’मालिकेतील ही अभिनेत्री स्वतःला समजते करीना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 4:28 PM

‘काळभैरव रहस्य-2’मधील आदिती गुप्ताची ड्रेसिंग स्टाइल पाहिल्यास त्यावर करीनाच्या या चित्रपटातील कपड्यांची छाप पडलेली स्पष्टपणे दिसते अशा कॉम्लिमेंट तिला मिळतात असे तिचे म्हणणे आहे.

‘जब वी मेट’ चित्रपटातील करीना कपूरच्या स्टायलिश लूकने सा-यांनाच भुरळ पाडली होती. विशेषतः तिच्या ड्रेसिंग स्टाइलने तरुणींमध्ये नवी फॅशन निर्माण केली होती. ‘स्टार भारत’ वाहिनीवरील ‘काळभैरव रहस्य-2’मधील आदिती गुप्ताची ड्रेसिंग स्टाइल पाहिल्यास त्यावर करीनाच्या या चित्रपटातील कपड्यांची छाप पडलेली स्पष्टपणे दिसते अशा कॉम्लिमेंट तिला मिळतात असे तिचे म्हणणे आहे. बॉलिवूडमध्ये करीना स्टाइलिश अभिनेत्रींपैकी एक मानली जाते तर टीव्ही क्षेत्रात आदिती स्वतःला स्टायलिश अभिनेत्रींपैकी असल्याचे मानते.आदितीला अशी सुंदर वेशभूषा निश्चित केल्याबद्दल तिच्या वेशभूषाकाराची नक्कीच प्रशंसा करावी लागेल. या मालिकेत आदिती गुप्ताची वेशभूषा पाहिल्यावर प्रेक्षकांना ‘जब वी मेट’ चित्रपटातील करीना कपूरची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही असे तिला वाटते.

'काल भैरव रहस्य २'मध्ये वीरवर्धनची भूमिका साकारताना गौतम रोडे आपला आवाज हरवून बसला. आपल्या कठोर मेहनत आणि उत्तम व्यक्तिरेखांसाठी मानला जाणाऱ्या गौतमने कथानकाच्या मागणीनुसार चित्रीकरणाच्या वेळेस खूप आरडाओरडा केली आणि अर्थातच त्याचा त्याच्या शरीरावर विपरीत परिणाम झाला. ह्यासाठी खूप एनर्जीची गरज होती. मात्र यामुळे गौतमचा घसा बसला. गौतम म्हणाला, 'मला व्यक्तिरेखा चांगल्याप्रकारे साकारायला आवडतात. 'काल भैरव 'च्या चित्रीकरणाच्या वेळेसही निर्मात्यांनी मी खोटा खोटा शॉट द्यावा असे सुचवले, पण मी मानले नाही.

अशा व्यक्तिरेखा शरीरावर परिणाम करतातच. पण ते चालायचेच. मी गरम पाणी पित आहे आणि औषधेही सुरू आहेत. ' 'कालभैरव रहस्य' मालिकेचा दुसरा सीझन लवकर स्टार भारत वाहिनीवर दाखल होणार आहे. पापा बाय चांस मालिकेच्या जागी ही मालिका संध्याकाळी सात वाजता प्रसारीत होणार आहे. 'कालभैरव रहस्य' मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर निर्मात्यांनी दुसरा सीझन बनवण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या भागात छवी पांडे, राहुल शर्मा व सरगुन कौर प्रमुख भूमिकेत होते.

टॅग्स :काल भैरव रहस्य २