Join us  

टीव्हीवरील ही अभिनेत्री आहे भलतीच ग्लॅमरस, घटस्फोटानंतर गेली होती डिप्रेशनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 5:01 PM

शाका लाका बूम बूम या मालिकेतून बालकलाकार म्हणून डेब्यू केलं होतं.

आपल्या दमदार अदाकारीने आणि अदांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री जेनिफर विंगेट हे आज  टेलिव्हिजन विश्वात मोठं नाव आहे. वयाच्या 12व्या वर्षी अभिनयाला सुरुवात करणाऱ्या जेनिफरने शाका लाका बूम बूम या मालिकेतून बालकलाकार म्हणून डेब्यू केलं होतं.  सध्या तिची 'बेपनाह 2' ही मालिका तूफान गाजत आहे. 

जेनिफर सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो, व्हिडीओ आणि आगामी प्रोजेक्टची माहिती ती सोशल मीडियावर देत असते. जेनिफरच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नजर टाकली तर त्यात तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतात. तिच्या फॅन्सानासुद्धा तिचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज भावतो. 

जेनिफर नेहमीच पर्सनल लाईफवरुन कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये राहिली. करण सिंह ग्रोव्हर आणि जेनिफर 'दिल मिल गए' या मालिकेच्या शूटिंग दरम्यान भेटले होते त्यानंतर  त्यांनी 1012 मध्ये लग्न केले आणि 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.जेनिफर ही करणची दुसरी पत्नी होती. याआधी करणने अभिनेत्री श्रद्धा निगमसोबत लग्न केलं होतं.

करण सिंह ग्रोव्हरसोबत घटस्फोट झाल्यानंतर जेनिफर विंगेट एका मुलाखतीत म्हणाले होती की, 'जर तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये खूपआधीपासून कास करत असाल तर तुमची इच्छा नसूनही तुम्ही वेगवेगळ्या वादात अडकता. त्यामुळे आमच्या जीवनात ढवळाढवळ होत राहते. पण माझं काम मला शांत राहणं शिकवतं. कोणतीही कॉन्ट्रोव्हर्सी मला त्रास देऊ शकत नाही. अनेक गोष्टींना मी इग्नोर करते'. 

जेनिफरने मालिकांसोबतच 'राजा की आएगी बारात, राजा को रानी से प्यार हो गया, कुछ ना कहो, लव किया और लग गई, लाइफ reboot नहीं होती, फिर से या सिनेमांमध्येही काम केलं. 

टॅग्स :जेनिफर विगेंट