Join us

​यह उन दिनो की बात है फेम आशी सिंह पडली पद्मिनी कोल्हापुरेच्या लूकच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 11:21 IST

लोक चित्रपट तारकांकडे त्या-त्या काळातील स्टाइल आयकॉन म्हणून बघत आले आहेत आणि आपल्या कौटुंबिक समारंभात आणि लग्न प्रसंगात त्यांच्या ...

लोक चित्रपट तारकांकडे त्या-त्या काळातील स्टाइल आयकॉन म्हणून बघत आले आहेत आणि आपल्या कौटुंबिक समारंभात आणि लग्न प्रसंगात त्यांच्या ड्रेसिंग स्टाइलची नक्कल देखील करत आले आहेत. नव्वदच्या दशकात श्रीदेवी, मीनाक्षी शेषाद्री, पद्मिनी कोल्हापुरे यांसारख्या सौंदर्यवतींनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते आणि सर्व वयोगटातील लोकांची वाहवा आणि प्रेम मिळवले होते. त्याकाळच्या मुली चार-चौघांत उठून दिसण्यासाठी त्याच अभिनेत्रींचे पोशाख आणि केशरचना यांची नक्कल करत असत. यह उन दिनो की बात है मालिकेतील आगामी कथानकात नैनाची भूमिका करणार्‍या आशी सिंहचा लुक प्रेम रोग चित्रपटातील पद्मिनी कोल्हापुरेच्या लुक सारखा असणार आहे.पद्मिनी कोल्हापुरेने तिच्या कारकिर्दीत एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. पण तिच्या प्रेमरोग या चित्रपटाची विशेष चर्चा झाली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी तिला पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले होते. या चित्रपटात ऋषी कपूरसोबत तिची जोडी जमली होती. या चित्रपटातील ये गलिया ये चौबारा हे गाणे चांगलेच गाजले होते. नव्वदीच्या दशकात तर या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली होती. यह उन दिनो की बात है या मालिकेचा काळ हा नव्वदीचा असल्याने आता एका दृश्यात आशी सिंग पद्मिनी कोल्हापुरे सारखे कपडे घालणार असून प्रेम रोगमधील तिच्या लूकमध्ये दिसणार आहे. पद्मिनी कोल्हापुरेसारख्या अभिनेत्रीचा लूक मालिकेसाठी करायला मिळत असल्याने आशी चांगलीच खूश आहे. याविषयी ती सांगते, “ही मालिका नव्वदच्या दशकाच्या पार्श्वभूमीवर आधारित असल्यामुळे माझा लुक त्या काळातील लोकप्रिय अभिनेत्रीसारखाच असणार आहे. क्रिएटिव्ह टीम आणि मी यावर खूप चर्चा केली आणि वेगवेगळ्या पॅटर्नवर विचार केला आणि अखेरीस पद्मिनी कोल्हापुरेचा लुक मी स्वीकारला. प्रेम रोग असो, जमाने को दिखाना है असो किंवा प्यार झुकता नहीं असो ही सुंदर अभिनेत्री नेहमीच निरागस आणि शालीन दिसली आहे आणि स्टाइल आयकॉन ठरली. तिची सुंदर गुलाबी साडी आणि ज्या कलात्मकतेने तिने ती परिधान केली होती, त्याची मी प्रचंड फॅन आहे. या मालिकेमुळे मला तशीच साडी घालता आली याचा मला आनंद आहे.”Also Read : यह उन दिनों की बात है या मालिकेत जयश्री टी दिसणार या भूमिकेत