Join us  

Confirm! इस्माईल दरबार यांचा मुलगा जैद करतोय गौहर खानला डेट, वडिलांनीच दिली कबूली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 1:37 PM

सध्या गोहर खान आणि जैद दरबारसोबत असलेल्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आहेत

सध्या गोहर खान आणि जैद दरबारसोबत असलेल्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आहेत. दोघे एकमेकांसोबतचे फोटो सोशल  मीडियावर शेअर करत असतात. गौहरचा बर्थ डे जैदने सेलिब्रेट केले होता. इन्स्टाग्रामवर फोटोदेखील शेअर केले होते. दोघांनी रिलेशनशीपमध्ये असल्याची गोष्ट ऑफिशियली कन्फर्म केले नाही. मात्र जैदने वडील इस्माइल दरबार यांनी कन्फर्म केले आहे की, गौहर आणि जैद रिलेशनशीपमध्ये आहेत. 

 

जैदच्या वडिलांनी केले कन्फर्मटाईम्स ऑफ इंडिया दिलेल्या मुलाखतीत, संगीतकार इस्माइल दरबार यांनी कंफर्म केले आहे की,गौहर आणि जैद रिलेशनशीपमध्ये आहेत. जैदने आपली सावत्र आईला फोन करुन आपल्या रिलेशनशीपबाबत सांगितले. जैद आपल्या वडिलांनासोबत राहत नाही. पुढे ते म्हणाले, माझं मुलांसोबतचं नातं बाप आणि मुलांसारखेच आहे. जैद मला सांगले की तो गौहरला डेट करतो आहे. जर जैदने गौहरशी लग्न केले तर मी त्या दोघांना आर्शीवाद देईन.  जैदने इस्मायल दरबार यांची पत्नी आयशाला फोन करुन गौहरबाबत सांगितले

जैद गौहर खानपेक्षा १२ वर्षांनी लहान आहे.  जैद हा अभिनेता, इफ्लूएंसर, कंटेट क्रिएटर आहे. सोशल मीडियावर त्याचे भरपूर फॉलोअर्स आहेत. तो एक प्रोफेशनल डान्सरही आहे.जैदआधी गौहर खानचं नाव टीव्ही अभिनेता कुशल टंडनसोबत जुळलं होतं. दोघांचं हे नातं बिग बॉसच्या घरात सुरू झालं होतं. दोघांचा सोबत एक म्युझिक व्हिडीओ सुद्धा होता. नंतर त्याचं ब्रेकअप झालं होतं.

टॅग्स :गौहर खान