Join us  

इश्तियाक खानची फॅन मोमेंट!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 4:08 AM

‘स्टार प्लस’वरील ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ या मालिकेत पूतनची भूमिका रंगविणारा अभिनेता इश्तियाक खान हा अलीकडेच ‘आयपीएल’ ...

‘स्टार प्लस’वरील ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ या मालिकेत पूतनची भूमिका रंगविणारा अभिनेता इश्तियाक खान हा अलीकडेच ‘आयपीएल’ स्पर्धेतील एक सामना पाहण्यासाठी दिल्लीत गेला होता. क्रिकेटचा अतिशय शौकीन असलेला इश्तियाक खान हा ‘किंग्ज इलेव्हन पंजाब’ या संघाला उत्तेजन देत होता. प्रत्यक्ष मैदानातून हा सामना बघता येत असल्याने तो अगदी खुशीत होता. ‘दिल्ली डेअरडेव्हिल्स’ संघाला हरवून ‘किंग्ज इलेव्हन पंजाब’ संघाने हा सामना जिंकला. किंग्ज इलेव्हन पंजाबचा कप्तान आर. अश्विन याला ‘स्टार प्लस’तर्फे ‘नई सोच’ हा चषक इश्तियाक खानच्या हस्ते प्रदान करण्यात आल्याने इश्तियाक खान फारच आनंदित झाला होता.इश्तियाक खानने सांगितले, “मी आर. अश्विनचा फार मोठा चाहता असल्याने किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने हा सामना जिंकल्याचा मला फारच आनंद झाला. त्याला माझ्या हस्ते चषक दिल्यामुळे आणि त्याच्या शेजारी उभे राहता आल्यामुळे मी खूपच आनंदित झालो होतो. त्याने ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ या मालिकेतील माझ्या कामाची प्रशंसा केली आणि आपल्याला जेव्हा वेळ मिळतो, तेव्हा मी ही मालिका नक्कीच पाहतो, असेही त्याने मला सांगितलं. त्याने मला या मालिकेसाठी शुभेच्छाही दिल्या. ती एक खरोखरच संस्मरणीय संध्याकाळ होती.”प्रत्येक भागात नवे राजकीय विडंबन,भ्रष्ट नेत्यांवरील तिरकस शेरेबाजी आणि पुरेपूर करमणुकीमुळे ‘स्टार प्लस’वरील ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होत चालली आहे.नेहमीच्या सासू-सुनेच्या रटाळ कथांनी भरलेल्या मालिकांच्या विश्वात या मालिकेने आपल्या नावीन्यपूर्ण विषयामुळे ताज्या हवेची झुळूक आणली आहे.लोकांच्या सेवेपेक्षा आपले खिसे भरणे हेच ज्याचे सत्तासंपादण्यामागील ध्येय आहे, अशा चैतूलाल या भ्रष्ट राजकीय नेत्याची भूमिका या मालिकेत राजीव निगम साकारीत आहेत. गेली अनेक वर्षे विनोदी लेखन आणि स्टॅण्ड-अप कॉमेडियनचे काम केलेल्या राजीव निगम यांनी आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित केले आहे.