Join us  

या कारणामुळे नीती टेलरने केले सीक्रेट मॅरेज, फोटो शेअर करत दिली गुड न्युज !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2020 2:50 PM

नीती टेलरचे लाखो फॅन्स तिला सोशल मीडियावरही फॉलो करतात. सध्या सोशल मीडियावरील नीतीचे काही  फोटो सध्या सा-यांसाठीच चर्चेचा विषय ठरले आहेत. 

छोट्या पडद्यावरील रसिकांची लाडकी अभिनेत्री नीती टेलर. 'इश्कबाज' भूमिकेमुळे नीती रसिकांच्या मनात घर करुन आहे. त्यामुळे तिच्याबाबतची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते. तिचं सध्या काय सुरु आहे, याबाबत माहिती घेण्याची तिच्या फॅन्सना उत्सुकता असते. नीतीचे लाखो फॅन्स तिला सोशल मीडियावरही फॉलो करतात. सध्या सोशल मीडियावरील नीतीचे काही  फोटो सध्या सा-यांसाठीच चर्चेचा विषय ठरले आहेत. 

नीतीने प्रियकर परीक्षित बावासोबत  नुकतेच सिक्रेट वेडिंग केले आहे. ऑगस्टमध्येच  लग्नाचा गाजावाजा न करता ती विवाहबंधनात अडकली आहे.कोविड 19ची परिस्थिती बघता दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नाचा निर्णय घेतला. लग्नाच्या दोन महिन्यांनी नीतीने लग्नाविषयी सांगितले आहे.

नीतीने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तिने 13 ऑगस्ट रोजी परीक्षित बावाशी लग्न केले. लग्नासाठी आधी ऑक्टोबर महिन्यातील मुहूर्त काढण्यात आला होता. मात्र कोविड 19 च्या परिस्थितीत बघता त्यांनी लग्न पुढे ढकलले नाही आणि 13 ऑगस्ट रोजी लग्न केले. खरं तर 13 ऑगस्ट रोजी साखरपुडा होणार होता. मात्र त्याच दिवशी लग्न करण्यात आले. नीतीचे पती परीक्षित हे भारतीय लष्कराचे अधिकारी आहेत. 

नववधूच्या रूपात अतिशय सुदंर दिसते.  आकर्षक लेहंगा, डोक्यावर मोठी बिंदी, नाकात भली मोठी नथ, कपाळावर सिंदूर आणि गळ्यात दागदागिने अशा अवतारात नीतीचे सौंदर्य खुलून गेल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच नववधू रूपातील फोटो तिने शेअर केले होते.

 

फोटो पाहून चाहतेही संभ्रमात पडले होते. मात्र आज नीतीने लग्न केल्याची बातमी शेअर चाहत्यांसह शेअर केली आहे. तिचे फोटो पाहून चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.