Join us  

Indian Idol 12: पवनदीपने नाही शिकविला अरूणिताला हार्मोनियम वाजवायला, व्हायरल व्हिडीओतून निर्मात्यांचा झाला पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 4:32 PM

इंडियन आयडॉल १२च्या निर्मात्यांनी पुन्हा एकदा अरूदीपबद्दल खोटी माहिती दिली आहे. अरूणिताच्या एका व्हायरल व्हिडीओने निर्मात्यांची पोलखोल केली आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो इंडियन आयडॉल १२ गेल्या काही महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. दरम्यान आता या शोमधील चर्चेत असणारी स्पर्धक अरूणिता कांजीलालचा जुना व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमुळे शो पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. शोच्या टीआरपीसाठी निर्मात्यांनी एकानंतर एक खोटे बोलत आहे. मात्र प्रत्येक वेळेला सोशल मीडियामुळे त्यांची पोलखोल झाली आहे.

सोशल मीडिया सेंसेशन बनलेल्या अरुणिता कांजीलालचे प्रत्येक फोटो आणि व्हिडीओ मिनिटात व्हायरल होतात. अरूणिताचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात ती तिच्या कुटुंबासोबत सराव करताना दिसते आहे. हा व्हिडीओ दीड वर्षांपूर्वीचा असल्याचे सांगितले जात आहे. 

विशेष बाब म्हणजे या प्रॅक्टिसदरम्यान ती हार्मोनियमवर बोटे चालवताना दिसते आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निर्मात्यांचा खोटारडेपणा समोर आला आहे. खरेतर या सीझनमधील गर्ल्स व्हर्सेस बॉइज स्पेशल एपिसोडपूर्वी अरूणिता आणि पवनदीपचे बरेच फोटो व्हायरल झाले होते. या फोटोंसोबत असे वृत्त शेअर केले गेले की पवनदीपने अरुणिताला हार्मोनियमची ट्रेनिंग दिली आहे. या विशेष भागात अरूणिताने अंजली गायकवाडच्या परफॉर्मन्ससोबत हार्मोनियम वाजविले. परफॉर्मन्स संपल्यानंतर परिक्षक अनु मलिकने अरूणिताला विचारले की तुला हार्मोनियम वाजवायला कोणी शिकवले?

त्यावर अरूणिताने म्हटले की, पवनदीप राजनने हार्मोनियम शिकण्यासाठी तिची मदत केली. अरूणिताने सांगितले की, मला नेहमीच हार्मोनियम शिकायचे होते पण तशी संधी मिळाली नव्हती. शेवटी, इंडियन आयडॉल १२ शोमुळे हार्मोनियम शिकण्याची संधी मिळाली. पवनदीप राजनने मला काही आठवड्यापूर्वी त्याचे ट्रेनिंग दिले ज्यामुळे मला या मंचावर प्रदर्शन करण्यासाठी आत्मविश्वास मिळाला. मी भविष्यात त्याच्याकडून आणखी काही संगीत इंस्ट्रुमेंट शिकण्याची आशा करते. 

मात्र जेव्हा अरूणिता आधीपासून इतके चांगले हार्मोनियम वाजवते तर तिला शिकण्याची गरज का पडली? म्हणजेच पुन्हा एकदा निर्मात्यांनी टीआरपीसाठी प्रेक्षकांसमोर अरूदीपबद्दल खोटा ड्रामा क्रिएट केल्याचा आरोप होतो आहे.

टॅग्स :इंडियन आयडॉल