Join us  

मला स्पर्धकांचं कौतुक करण्यास सांगितलं होतं...! सुनिधी चौहाननं सांगितली ‘इंडियन आयडल’ची ‘रिअ‍ॅलिटी’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 10:28 AM

Indian Idol 12 : तुम्हाला आठवत असेलच की, सुनिधी ‘इंडियन आयडल’च्या पाचव्या आणि सहाव्या सिझनमध्ये जज होती. त्याचदरम्यानचे अनुभव तिने शेअर केलेत.

ठळक मुद्देलवकरात लवकर यशस्वी होण्याच्या हव्यास स्पर्धकांना मानसिकदृष्ट्या निश्चितपणे प्रभावित करतो. यात स्पर्धकांची चूक नाहीच. हा फक्त टीआरपीचा खेळ आहे, असेही सुनिधी म्हणाली.

‘इंडियन आयडल’ या रिअ‍ॅलिटी शोचा 12 सीझन (Indian Idol 12) चर्चेत आहे तो वादांमुळे. होय, ‘किशोर कुमार स्पेशल’ एपिसोडवरून सुरू झालेला हा वाद तूर्तास तरी थांबण्याची चिन्हे नाहीत. किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार (Amit Kumar) यांनी या एपिसोडवर नाराजी व्यक्त केली. पाठोपाठ ‘इंडियन आयडल’च्या पहिल्या सीझनचा विजेता अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) याने या शोवर भडास काढली. आता बॉलिवूडची दिग्गज गायिका सुनिधी चौहान (Sunidhi Chauhan) हिनेही शोबद्दल हैराण करणारा खुलासा केला आहे. मला शोच्या कंटेस्टंटचे कौतुक करण्यास सांगितले गेले होते, असे सुनिधीने म्हटले आहे.

ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सुनिधीने या रिअ‍ॅलिटी शोची ‘रिअ‍ॅलिटी’ उघड केली. मला शोच्या स्पर्धकांचे कौतुक करण्यास सांगितले गेले होते. सरसकट सगळ्यांचे नाही. पण हो, कौतुक करायचे असे मला सांगण्यात आले होते. मेकर्सला अपेक्षित असणा-या सगळ्या गोष्टी मी करू शकले नाही आणि त्यामुळे मला शोपासून दूर जावे लागले, असे सुनिधी म्हणाली.तुम्हाला आठवत असेलच की, सुनिधी ‘इंडियन आयडल’च्या पाचव्या आणि सहाव्या सिझनमध्ये जज होती. त्याचदरम्यानचे अनुभव तिने शेअर केलेत.

 नेहा, हिमेश, विशाल यांच्याबद्दलही बोलली‘इंडियन आयडल 12’ जज करत असलेले नेहा कक्कर, हिमेश रेशमिया व विशाल ददलानी यांच्याबद्दल सुनिधी बोलली. हे तिन्ही जज कधीच स्पर्धकांच्या चुका सुधारताना दिसत नाहीत. मग सकारात्मक टीकेसह शो जज करणे सोडाच. असे रिअ‍ॅलिटी शो संगीत शौकीनांसाठी मोठे तिकिट ठरत आहेत, हे खरे. पण यात स्पर्धकांचेच नुकसान होते. स्पर्धकांना त्यांच्या भावुक कथामुळे रातोरात प्रसिद्धी व ओळख मिळते. काही स्पर्धक खरोखर मेहनत घेतात. पण लवकरात लवकर यशस्वी होण्याच्या हव्यास स्पर्धकांना मानसिकदृष्ट्या निश्चितपणे प्रभावित करतो. यात स्पर्धकांची चूक नाहीच. हा फक्त टीआरपीचा खेळ आहे, असेही सुनिधी म्हणाली.

अमित कुमारांच्या मुलाखतीबद्दल म्हणाली... मला कॅमे-यासमोर जाण्याआधी सर्व स्पर्धकांचे कौतुक करण्यास सांगितले गेले होते, असा खुलासा अलीकडे अमित कुमार यांनी केला होता. यावरही सुनिधी चौहान बोलली. ती म्हणाली, ‘आपल्याला अमित कुमार यांच्या त्या मुलाखतीला विसरुन चालणार नाही. मेकर्सचा हेतू काय आहे? इंडियन आयडलचे मेकर्स हा शो फक्त पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत का? स्पर्धा खूप आहे. माझ्या मते, हे केवळ शोकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी, प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी केले जाते आणि त्यांचे मनसूबे यशस्वी होतातही. यात रिअल टॅलेंटचे नुकसान होते.

कंटेस्टंट एका टेकमध्ये गातात?रिअ‍ॅलिटी शोमध्ये सर्व स्पर्धक एका टेकमध्ये गातात का? असा सवाल केला असता ती म्हणाली, ते गातात. पण कधी कधी काही सिंगरच्या गाण्यात वा रेकॉर्डिंगमध्ये काही त्रुटी दिसल्यास शो टेलिकास्ट करण्यापूर्वी त्या त्रुटी दूर केल्या जातात.  

टॅग्स :सुनिधी चौहानइंडियन आयडॉल