Join us  

Indian Idol 12: पवनदीप जिंकलाच कसा? भडकले अरूणिताचे फॅन्स, असा व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 2:56 PM

Indian Idol 12 : पवनदीपने इंडियन आयडलची ट्रॉफी जिंकताच त्याच्या चाहत्यांमध्ये आनंद पसरला. याऊलट अरूणिता कांजीलालचे चाहते निराश झालेत.

ठळक मुद्देशो जिंकल्यानंतर पवनदीप खुश्श आहे. इंडियन आयडल गाजवल्यानंतर आता त्याचा वेगळाच प्लान आहे. होय, अरूणिता व अन्य स्पर्धकांसोबत केदारनाथला जायची त्याची योजना आहे.

काल 15 ऑगस्टला ‘इंडियन आयडल 12’चा (Indian Idol 12) ग्रँड फिनाले रंगला. दुपारी 12 ते रात्री 12 अशा या 12 तासांच्या या फिनालेमध्ये अनेक धमाकेदार परफॉर्मन्स झालेत आणि सरतेशेवटी विजेत्याचे नाव घोषित करण्यात आले. पवनदीप राजन  (Pawandeep Rajan) या सीझनचा विनर ठरला. पवनदीपच्या नावाची घोषणा होताच त्याच्या चाहत्यांमध्ये आनंद पसरला. याऊलट अरूणिता कांजीलालचे (Arunita Kanjilal) चाहते निराश झालेत. यानंतर काय तर, पवनदीप व अरूणिताचे चाहते सोशल मीडियावर आपआपसांत भिडले.अरूणिताच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला. पवनदीपपेक्षा अरूणिता या विजेतेपदाची मोठी दावेदार होती. ती पवनदीपपेक्षा कितीतरी अधिक सरस होती, अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या.

काहींनी तर ‘इंडियन आयडल 12’ स्क्रिप्टेड असल्याचे म्हणत आपला संताप व्यक्त केला. मतांचा आकडा न सांगता विजेता कसा घोषित केला? असा सवालही काही युजर्सनी केला.

तुम्ही पवनदीपला विजेता ठरवले असले तरी आमच्यासाठी अरूणिताच खरी विजेती आहे, अशा कमेंट्सही सोशल मीडियावर पाहायला मिळाल्या.काल रात्री 12 च्या ठोक्याला ‘इंडियन आयडल 12’च्या विजेत्याची घोषणा झाली. पवनदीपने ट्रॉफी जिंकली तर अरूणिता व सायली कांबळे रनरअप ठरल्या. निहाल तारो, मोहम्मद दानिश व शन्मुखप्रिया अनुक्रमे चौथ्या, पाचव्या व सहाव्या क्रमांकावर राहिलेत. शो जिंकल्यानंतर पवनदीपला इंडियन आयडलची ट्रॉफी, 25 लाखांचा चेक आणि एक कार गिफ्ट मिळाली.

अरूणितासोबत केदारनाथला जाणार पवनदीपशो जिंकल्यानंतर पवनदीप खुश्श आहे. इंडियन आयडल गाजवल्यानंतर आता त्याचा वेगळाच प्लान आहे. होय, अरूणिता व अन्य स्पर्धकांसोबत केदारनाथला जायची त्याची योजना आहे. 10 दिवसांच्या या ट्रिपमध्ये सगळे धम्माल मज्जा करणार आहेत. याशिवाय आशीष कुलकर्णीसोबत मिळून मुंबईत काम करण्याचाही त्याचा विचार आहे.

टॅग्स :इंडियन आयडॉल