Join us

त्या बलात्काराच्या घटनेने हादरली दिव्यांका, थेट मोदींना घातलं गा-हाणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 11:21 IST

एका अल्पवयीन मुलीवर चंदीगढमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी चांगलीच संतापली आहे. मुलींच्या संरक्षणासाठी दिव्यांकाने थेट ...

एका अल्पवयीन मुलीवर चंदीगढमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी चांगलीच संतापली आहे. मुलींच्या संरक्षणासाठी दिव्यांकाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच गा-हाणं घातलं आहे.चंदीगढच्या बलात्काराच्या घटनेने व्यथित आणि संतप्त झालेल्या दिव्यांकानं एकामागून एक ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. देशात 'बेटी बचाओ नाही' तर 'बेटिंयो को बचाओ' या अभियानाची गरज असल्याचे ट्विट तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे. तसंच देशात स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत बलात्कारी रुपी कचरा हटवण्याची मागणीही तिने मोदींकडे केली आहे.'ये है मोहब्बते' या छोट्या पडद्यावरील मालिकेत ईशी माँ ही भूमिका साकारणा-या दिव्यांकाने आता तर भीतीपोटी मुलीची आई बनणं हा विचारच करवत नसल्याचेही म्हटलं आहे.चंदीगढमध्ये आठव्या इयत्तेत शिकणा-या 12 वर्षीय मुलीवर स्वातंत्र्यदिनीच बलात्कार झाल्याची घटना घडली होती. शाळेतील स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आटोपून ती मुलगी शॉर्टकट मार्गाने आपल्या घराकडे जात होती. त्यावेळी एका नराधमाने चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला होता.या घटनेमुळे दिव्यांकाने सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवर आपला संताप व्यक्त केला. बलात्कारासारखं एक अमानवी कृत्य करणा-याला कठोरातील कठोर शिक्षा का देऊ शकत नाही ? आणखी एक बलात्कार कोणत्या स्वातंत्र्याच्या आपण गप्पा मारत आहोत असं पहिलं ट्विट तिने केले. दुस-या ट्विटमध्ये तिने महिलांनी मतदानावर बहिष्कार टाकावं असं आवाहन केलं.कारण प्रत्येक राजकीय पक्षाला महिला इतक्या गरजेचं वाटत नसल्याचे तिने ट्विटमध्ये नमूद केले आहे.बलात्का-यांच्या स्वर्गात राहतो आहोत असं तिने या ट्विटमध्ये म्हटलं आहे.क्या बेटी बचाओ असा सवाल तिने आपल्या तिस-या ट्विटमध्ये केलाय. आता बेटी बचाओ नाही तर बेटी को बचाओ म्हणण्याची वेळ आलीय अशी खंत तिने व्यक्त केली आहे. मुलगा हवा असा आग्रह नाही, मात्र मुलीला जन्म देण्यासाठी भीती वाटत असल्याचं दिव्यांकाने म्हटलं आहे.मुलीला जन्म दिलाच तर स्वर्गातून दहशतीच्या नरकात का पाठवलं यावर तिला काय उत्तर देऊ असा सवालही तिने उपस्थित केलाय.अखेरीस तिने याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दाद मागितली आहे.बलात्कारी या विषवल्लीपासून मुक्ती द्या, समाजाला लागलेली ही कीड, हा कचरा दूर करा असं साकडे तिने घातले आहे. नरभक्षकांसह जगणं कठीण झाल्याचे दिव्यांकाने मोदींना केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.