Join us  

'सारं काही तिच्यासाठी' उत्कंठावर्धक वळणावर, निशीला मुंबईला जाणं महागात पडणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 3:49 PM

Sara Kahi Tichyasathi : 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत नुकतेच निशी आणि नीरजचा साखरपुडा झाला. निशी आपल्या फायनल परीक्षेसाठी अभ्यासाला लागली आहे.

'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत नुकतेच निशी आणि नीरजचा साखरपुडा झाला. निशी आपल्या फायनल परीक्षेसाठी अभ्यासाला लागली आहे. लवकरच निशीची परीक्षा संपणार असून तिचे लग्न होईपर्यंतचे जे काही थोडे दिवस उरले आहेत त्यात निशीने घरातल्या गोष्टी शिकून घ्याव्यात, संसाराचे धडे उमाकडे गिरवावेत असा फतवा दाईचीने काढलाय. पण निशीने बॅडमिंटनचा सराव करावा असे नीरजला वाटते. 

नीरज निशीला सांगतो की स्टेट लेव्हलच्या टीमचे सिलेक्शन होणार आहे आणि त्यात तू भाग घ्यावास अशी माझी इच्छा आहे. निशी त्याची समजूत काढते. भाग घेतला तर मला प्रॅक्टीस करावी लागेल. त्यासाठी तोकडे कपडे घालावे लागतील जे दादांना आवडणार नाही. लग्नानंतर नवऱ्याच्या किंवा सासरच्यांच्या आवडीनुसार मुलीने राहावं असं दादा म्हणतात आपलं लग्न झालं की ते मला खेळायला विरोध करणार नाहीत. आता आपण त्यांना दुखवू या नको. इकडे मेघना निशीसाठी मुंबईला जाऊन खरेदी करायची आहे असे सांगून निशीला आपल्यासोबत मुंबईला घेऊन जायची परवानगी रघुनाथकडे मागते. 

दादांचे असे म्हणणे आहे की एकदा विश्वास टाकलाय, आता पुन्हा मनात शंका घ्यायची नाही. ते मेघनाला निशीला सोबत घेऊन जायची परवानगी देतात. मेघना आणि निशी मुंबईला पोहचतात. मेघना निशीला थेट स्टेट लेव्हल सिलेक्शनसाठी नाव नोंदवायला घेऊन जाते. आता काय होईल जेव्हा दादा खोतांना ही बातमी कळेल? ह्या गोष्टीसाठी ते मेघनाला माफ करतील का? निशीला मुंबईला जाणं महागात पडणार का? मेघनाच्या या गोष्टींनी निशी-नीराजच्या लग्नात काही समस्या येईल का? या हे सर्व जाणून घेण्यासाठी मालिका पाहावी लागेल.