Join us  

चक्क‘मे आय कम इन,मॅडम? मालिकेतील बावर्चीच्या भूमिकेसाठी घेतली गोविदांकडून प्रेरणा?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2017 3:31 PM

गोविंदाना हिरो नंबर वन सिनेमात साकारलेला बावर्ची आता संदिप आनंद साकारयाचा प्रयत्न करतोय.‘मे आय कम इन, मॅडम?’ या मालिकेने ...

गोविंदाना हिरो नंबर वन सिनेमात साकारलेला बावर्ची आता संदिप आनंद साकारयाचा प्रयत्न करतोय.‘मे आय कम इन, मॅडम?’ या मालिकेने आपल्या अपारंपरिक कथानकाद्वारे प्रेक्षकांना सतत गुंतवून ठेवले असून संदीप आनंद हा कथानकानुसार मालिकेत होणा-या  सा-या गडबडीला जबाबदार आहे. संदीपने या मालिकेत आतापर्यंत किती विविध रूपे घेतली असतील, त्याची गणना करणेही त्याने आता सोडून दिले आहे.या मालिकेच्या आगामी भागात संदीप आता आपली बॉस नेहा पेंडसे हिच्यासाठी चक्क आचारी बनला आहे.ही भूमिका साकारण्यासाठी संदीपने हरहुन्नरी अभिनेता गोविंदा याने ‘हीरो नं. 1’ या चित्रपटात साकारलेल्या आचारीच्या भूमिकेपासून प्रेरणा घेतली आहे. या भागात आचारीची भूमिका अचूक साकारण्यासाठी संदीपने हा चित्रपट 2 ते 3 वेळा बारकाईने पाहिला. ‘हीरो नं. 1’चित्रपटात नायिका करिष्मा कपूरच्या कुटुंबियांची मने जिंकून घेण्यासाठी गोविंदा त्या घरात आचारी म्हणून काम करतो.त्याचप्रमाणे ‘मे आय कम इन, मॅडम? मालिकेत संदीप आनंद आपल्या बॉसची मर्जी संपादन करण्यासाठी आचारी बनला आहे.या भागातील भूमिकेबद्दल विचारले असता संदीपने सांगितले, “मी स्वत: गोविंदाच्या अभिनयशैलीचा चाहता आहे.त्याने आपल्या चित्रपटांतून विविध भूमिकांना किती उत्कृष्ट न्याय दिला आहे, ते पाहून आपण चकित होतो. मला जेव्हा निर्मात्यांनी सांगितलं की मला पुढील भागात बावर्चीची भूमिका साकारायची आहे,तेव्हा माझ्या मनात तात्काळ गोविंदाच्या 'हीरो नं. 1' चित्रपटातील त्याची भूमिका उभी राहिली. मालिकेत चित्रीकरणापूर्वी मी हा चित्रपट बारकाईने पाहिला, त्यामुळे मला बावर्चीचं व्यक्तिमत्त्व अचूक उभं करता आलं. मी त्याच्या अभिनयाची नक्कल करीत नाहीये, पण त्याच्या भूमिकेतून प्रेरणा घेवूनच ही भूमिका केली असून रसिकांनाही माझी ही भूमिका पाहून गोविंदाच्या हिरो नंबर सिनेमाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.