Join us  

'या' कारणामुळे निगेटीव्ह भूमिकांमध्येच झळकते मानसी श्रीवास्तव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 4:09 PM

मालिकेत तिने असंख्य ग्लॅमरस पोशाख परिधान केले असून आपल्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे तिने ही व्यक्तिरेखा अधिकच आकर्षक केली आहे.

अभिनेत्री मानसी श्रीवास्तव सध्या ‘दिव्य दृष्टी’ या मालिकेत भूमिका साकारताना दिसत आहे. या मालिकेत ती लावण्याची भूमिका साकारीत असून ती रक्षित शेरगिलच्या (आध्विक महाजन) प्रेमात बुडालेली असते. त्याला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ती शक्य ते सर्व प्रयत्न करीत असते. मालिकेत तिने असंख्य ग्लॅमरस पोशाख परिधान केले असून आपल्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे तिने ही व्यक्तिरेखा अधिकच आकर्षक केली आहे. रूपसुंदर मानसीला तिच्या घार्‍्या डोळ्यांमुळे खलनायिकेच्या अनेक भूमिका देऊ केल्या जात आहेत. पण एखाद्या कलाकाराचे डोळे कसे आहेत, त्यामुळे त्याला विशिष्ट प्रकारच्या भूमिका देऊ नयेत, असे मानसीचे मत असल्याने ती अशा भूमिकांना नकार देत आहे.

तिच्या घार्‍्या डोळ्यांमुळे तिला खलनायिकेच्या भूमिकाच ऑफर केल्या आहेत, हे ऐकून तिला कसे वाटते, असे विचारल्यावर मानसी म्हणाली, “मला असे घारे डोळे लाभले हे मी माझं भाग्यही समजते आणि शापही मानते. कारण माझ्या डोळ्यांच्या रंगामुळे मला अनेक संस्थांच्या कास्टिंग विभागातून फोन येत आणि ते मला भूमिका देऊ करीत. ही कसली भूमिका आहे, असे विचारल्यावर मला कळायचे की मला देण्यात आलेली भूमिका ही खलनायिकेची भूमिका आहे. मला असे फोन जवळपास दररोज येतात आणि मला नकारात्मक भूमिका साकारावयाची नाही, असे सांगून मी त्यांना नकारही देत असते.”

‘दिव्य दृष्टी’ या मालिकेतील भूमिका माझ्या घार्‍्या डोळ्यांमुळे मिळालेली नाही. भारतात घार्‍्या डोळ्यांच्या व्यक्ती तशा कमीच असल्याने अशा व्यक्ती एखादी खलनायकाची किंवा खलनायिकेची भूमिका अधिक प्रभावीपणे करू शकतात, असा एक समज आहे. म्हणूनच मला खलनायिकेच्या भूमिकांसाठी इतके फोन येत असतात. सुदैवाने ही चुकीची समजूत आता नष्ट होत आहे.

 

उदारणच पाहायचं तर द्रष्टी धामी आणि संजिदा शेखकडे पाहा. त्यांचेही डोळे हलक्या रंगाचे असले, तरी त्या मालिकांमध्ये प्रमुख आणि सकारात्मक भूमिका सकारताना दिसतात.”