Join us  

'होणार सून मी या घरची' फेम राधिका देशपांडेची अशी एक सिरीज व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 2:50 PM

मुळची पुण्याची राधिका फक्त याच एकमेव गोष्टीमुळे चर्चेत नसून अलीकडेच तिने निर्माती म्हणून “योग तपस्वी अय्यंगार” या तिच्या संस्थेअंतर्गत पद्म्मविभूषण योग गुरु बी.के.एस. अय्यंगार यांच्या जीवनावर आधारित हिंदी आणि इंग्रजी नाट्यप्रयोग सुरु केले आहेत.

'होणार सून मी या घर'ची मालिकेतली गीता म्हणजेच अभिनेत्री राधिका देशपांडे तुम्हाला आठवत असेलच. सध्या राधिका खूप चर्चेत आहे, त्याचं कारणही तसंच खुसखुशीत आहे. अलीकडेच तिने एक धमाकेदार फोटोशूट करून घेतले आहे. यातल्या तिच्या काही बेधडक फोटोमुळे सोशल मीडियावर खूप चांगलीच पसंती मिळत आहे.दिवसाला एक असे एकूण साठ फोटोंची सिरीज तिने सुरु केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत अशा प्रकारची फोटो सिरीज होण्याची ही पहिलीच वेळ आहे.  

 

यासोबतच “अचाट गावची अफाट मावशी” या धमाल अशा बालनाट्यातून राधिका रंगभूमीवर पदार्पण करते आहे. रत्नाकर मतकरी लिखित हे नाटक, राधिकाचे वडिल संजय पेंडसे यांनी दिग्दर्शन केले आहे. यात राधिका मांजरीच्या भूमिकेत आहे. नाटकात ती मांजर सर्वांना यशस्वी व्हायला शिकवते, प्रेरणा देते. यात तुम्हीला राधिका अभिनया सोबत गातांना आणि नृत्य करताना दिसेल.

 

याशिवाय राधिका, “व्हॅनिला-स्ट्रॉबेरी अँड चॉकलेट या सिनेमात मंजू नावाच्या मुलीची भूमिका साकारते आहे. प्राण्यांवर निस्वार्थ प्रेम करायला शिकवणारी या सिनेमाची गोष्ट आहे. आपल्या बोल्ड आणि बेधडक फोटोशूट बद्दल राधिका सांगते कि, या फोटोशूटचे तसे काही वेगळे कारण नव्हते, माझा मित्र नचिकेत खासनीस याची कल्पना आणि अंगद जोशी फोटोग्राफर मित्र यांनी छान फोटो काढूया असे ठरले, मग विचार आला कि आपण साठ वेगवेगळ्या फोटोंची एक सिरीजच करुया म्हणून हे फोटोशूट. फोटोमध्ये तसे अश्लील असे काही नक्कीच नाहीये. चेहऱ्यावर आणि शरीरावर भाव अशी त्याची थीम आहे. स्वतःला नव्याने ओळखण्याचा प्रयत्न असे देखील आपण म्हणून शकतो. यानंतर मी पुणे ऑन द वे नावाची वेब सिरीज देखील घेऊन येणार आहे.