Join us  

बानी, लोपामधील कॅटफाइट ठरतेय हिट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2016 5:27 PM

‘बिग बॉस सीजन -६’ मध्ये गौहर खान आणि तनीषा मुखर्जी यांच्यातील कॅटफाइट खूपच गाजली होती. आजही त्यांच्यातील वितुष्ट कायम ...

‘बिग बॉस सीजन -६’ मध्ये गौहर खान आणि तनीषा मुखर्जी यांच्यातील कॅटफाइट खूपच गाजली होती. आजही त्यांच्यातील वितुष्ट कायम आहे. आता हाच सिलसिला ‘बिग बॉसच्या सीजन-१०’ मध्ये बानी जे आणि लोपामुद्रा राउत यांच्यात बघावयास मिळत आहे. प्रत्येक टास्क, नॉमिनेशन प्रक्रिया आणि प्रत्येक मुव्हमेंटवर त्यांच्यात वाद ठरलेला असतो. दोघींमधील ही कॅटफाइट त्यांच्यादृष्टीने जरी प्रतिष्ठेची किंवा चिंतेची समजली जात असली तरी प्रेक्षकांसाठी मनोरंजनात्मक ठरत आहे. या दोघींमध्ये वादाची ठिणगी एका टास्कदरम्यान पडली. बहुधा वाद झाल्यानंतर घरातील सदस्य पुन्हा एक होतात. मात्र बानी जे आणि लोपामुद्रा यांच्याबाबतीत असे दूरदूरपर्यंत कुठेही दिसत नाही. दिवसागणिक त्यांच्यातील वितुष्ट अधिक गडद होत आहे. एकमेकींना धोबीपछाड देण्यासाठी एकही संधी या दोघी दडवीत नाहीत. घरातच नव्हे तर चारचौघांसमोरदेखील या वाद घालायला कधीही मागे सरत नाहीत. याचा प्रत्यय नुकताच आला. दरवर्षीप्रमाणे शोमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत या दोघी आपसातमध्ये भिडल्या. हा वाद ऐवढा विकोपाला गेला की, बानीने रडत-रडत पत्रकार परिषदेतून वॉकआॅउट केले. दोघेही प्रबळ स्पर्धक असल्याने घरातील यांचा सफर आणखी काही दिवस असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जोपर्यंत या दोघी घरात आहेत, तोपर्यंत प्रेक्षकांना काही तरी नवीन मनोरंजनात्मक बघावयास मिळेल यात शंका नाही. त्यातच प्रियंका जग्गा या दोघींच्या भांडणाचा फायदा घेण्यासाठी पुढे येत असल्याने हा वाद आणखी किती विकोपाला जाऊ शकतो हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. फोटो : कॅप्टनशिपसाठी बानी जे, लोपामुद्रा आणि मोनालिसा यांच्यात झालेल्या या टास्कनंतरच बानी आणि लोपामध्ये वादाची ठिणगी पडली, जी आजही कायम आहे.