Join us  

'कसौटी जिंदगी के' मालिकेसोबतच हिना खान दिसणार आणखीन एका मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 4:22 PM

हिना खान 'कसौटी जिंदगी के' या मालिकेव्यतिरिक्त एकता कपूरच्या आणखीन एका मालिकेत दिसणार आहे.

ठळक मुद्देएकता कपूर टेलिव्हिजनची राणी - हिना खानहिनाने साकारलेल्या कोमोलिकाला मिळतोय चांगला प्रतिसाद

स्टार प्लस वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'कसौटी जिंदगी के'चा दुसरा सीझन नुकताच दाखल झाला असून यात कोमोलिकाच्या भूमिकेला घेऊन रसिकांमध्ये जास्त उत्सुकता पाहायला मिळाली. या मालिकेत कोमोलिकाच्या भूमिकेत अभिनेत्री हिना खान असून यातील तिचा लूक रसिकांना खूपच भावला आहे. कोमोलिकाच्या टीझरला अल्पावधीतच खूप प्रतिसाद मिळाला. तिने इंस्टाग्रामवर तिचा पहिला लूक शेअर केला. हिना या मालिकेव्यतिरिक्त एकता कपूरच्या आणखीन एका मालिकेत दिसणार आहे.  

मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, हिना खानने सांगितले की मी फक्त कोमोलिकाच्याच भूमिकेत दिसणार नाही तर मी एकता कपूरच्या आणखीन एका मालिकेत मी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पुढे हिना म्हणाली की, 'एकता कपूर टेलिव्हिजनची राणी असून तिच्यासारखे ध्येय व दृष्टीकोन असणारे इतर कोणीच नाही. जर तिला वाटते की मी दोन ड्रामा असणारे रोल करू शकते तर मी का नाकारू. बिग बॉसनंतर मला सकारात्मक भूमिकांच्या आणि चार बिग शोजच्या ऑफर आल्या. पण, जेव्हा मी एकताला भेटले आणि तिने मला या भूमिकांच्या ऑफर दिल्या तेव्हा मी नाही म्हणूच शकले नाही. मला दोन भूमिकांसाठी विचारणे माझ्यासाठी कॉम्प्लिमेंट आहे. तिने मला दुसऱ्या मालिकेबद्दल काही सांगितले नाही पण मोठा असेल आणि लोकांना भावेल, असे सांगितले.'हिना खानची कोमोलिकाची भूमिका रसिकांना भावते आहे. आता ती दुसऱ्या कोणत्या भूमिकेत दिसणार हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत. 

टॅग्स :कसौटी जिंदगी की 2हिना खान