Join us  

पाठकबाईंसोबतच्या नात्याची राणादाने 2 वर्षांपूर्वीच दिली होती जाहिरपणे कबुली?, हार्दिकची ती पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 3:45 PM

‘तुझ्यात जीव रंगला’ (Tuzhat Jeev Rangala ) या लोकप्रिय मालिकेतील राणादा आणि पाठकबाई या जोडीनं सगळ्यांनाच वेड लावलं होतं. खऱ्या आयुष्यातही ही जोडी एकत्र यावी, अशी प्रेक्षकांची भरून इच्छा होती.

Akshaya Deodhar and Hardik Joshi engagement : ‘तुझ्यात जीव रंगला’ (Tuzhat Jeev Rangala ) या लोकप्रिय मालिकेतील राणादा आणि पाठकबाई या जोडीनं सगळ्यांनाच वेड लावलं होतं. खऱ्या आयुष्यातही ही जोडी एकत्र यावी, अशी प्रेक्षकांची भरून इच्छा होती. प्रेक्षकांची ही इच्छा अखेर पूर्ण झालीये. होय, राणादा व पाठकबाई आता खऱ्या आयुष्यात पती-पत्नी बनणार आहेत. मालिकेत राणादाची भूमिका अभिनेता हार्दिक जोशीनं (Hardik Joshi) साकारली होती तर पाठकबाईची भूमिका अभिनेत्री अक्षया देवधरनं (Akshaya Deodhar) निभावली होती. काल हार्दिक व अक्षया यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर दोघांचाही साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याचे फोटो तुम्ही पाहिले असतीलच. आता याचे व्हिडीओही समोर आले आहेत.

हार्दिक आणि अक्षयाच्या साखरपुड्यानंतर हार्दिकने दोन वर्षांपूर्वी डिसेंबर 2019मध्ये केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. या पोस्टमध्ये राणादा ने पाठकबाईंसोबतचा एक फोटो शेअर केला होता जो आता व्हायरल होतोय. हा फोटो शेअर करताना हार्दिकने लिहिले होते, पडद्यावरची सोज्वळ chemistry नि् पडद्यामागची निखळ मैत्री...याच्याही जरा पल्याडच आहे आमचं "Strong Bonding!.." या पोस्टच्या माध्यमातून हार्दिकने अप्रत्यक्षपणे दोन वर्षांपूर्वी पाठकबाईंसोबतच्या नात्याची कबुली दिली असल्याचं बोललं जातंय. राणादाची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. 

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. मात्र याबद्दल त्या दोघांनी कधी सांगितले नव्हते. मात्र आता या दोघांनी साखरपुड्याचे फोटो शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची वार्ता दिली आहे. 

टॅग्स :हार्दिक जोशीअक्षया देवधर