शशांक व्यासने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या स्ट्रगलच्या दिवसांविषयी सांगितले आहे. त्याने म्हटले आहे की, मी २००९ मध्ये उज्जैनहून मुंबईला आलो. मुंबईत माझा एक मित्र राहात होता. तो मला मदत करेल याची मला खात्री होती. त्यामुळे मी मुंबईला येतो असे त्याला कळवले होते. दादर स्टेशनला मी ट्रेनमधून उतरलो आणि त्याला मी फोन केला तर त्याने माझे फोन उचललेच नाही. त्यामुळे आता काय करायचे हा मोठा प्रश्न माझ्यापुढे उभा होता. मी काही दिवस अंधेरीतील एका गुरूद्वारामध्ये राहिलो. तिथे दिवसाला मला ३० रुपये द्यावे लागत असे. तिथे जो पहिला येईल त्यालाच झोपायला बेड मिळत असे. मुंबईत आल्यावर अनेक रात्री मी टेन्शनमध्ये घालवल्या आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण १८ महिन्यात मी जवळजवळ २७५ ऑडिशन दिल्या आहेत. मी मुंबईत असताना माझ्या आयुष्यात अतिशय दुःखद घटना घडली. माझ्या आईचे निधन झाले. त्यामुळे मी काही दिवसांसाठी उज्जैनला परतलो. काहीही करून अभिनेता बनायचे असे ठरवूनच मी पुन्हा मुंबईला आलो. त्याच दरम्यान मला रिश्ता डॉट कॉम या मालिकेत छोटीशी भूमिका साकारायला मिळाली. त्यानंतर काहीच महिन्यात बालिका वधू या मालिकेतील जग्या ही भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली आणि माझे संपूर्ण आयुष्यच या मालिकेमुळे बदलून गेले. माझ्या आईच्या आशीर्वादामुळेच मला आज हे य़श मिळवता आले आहे असे मला नेहमीच वाटते.
Also Read : शशांकने हे काय केले?