Join us

देव : मोस्ट वाँटेड डिटेक्टिव्ह की वाँटेड क्रिमिनल...?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 18:10 IST

गुन्हेगारीचे जग असे आहे की, जे आजपर्यंत कुणीही समजू शकले नाही किंवा कुणीही समजून घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. गुन्हा ...

गुन्हेगारीचे जग असे आहे की, जे आजपर्यंत कुणीही समजू शकले नाही किंवा कुणीही समजून घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. गुन्हा आणि गुन्हेगार हे चतूरच नाही, तर गुन्हेगार स्वत:ला खूप चतूर समजतो. असे गुन्हेगार कधी कधी कायद्यापासून अनेक गोष्टींची लपवाछपवी करतात. पण, आता तसे करणे शक्य होणार नाही. कारण, आलाय डिटेक्टिव्ह देव बर्मन... जो कठीणातील कठीण केसचा सखोल अभ्यास करून गुन्हेगाराचा छडा लावतो.देव दिसायला तर सर्वसामान्यांतलाच आहे. मात्र, त्याची हटके विचारसरणी त्याला इतरांपेक्षा वेगळे बनवते. क्राईम सीनच्या तणावपूर्ण वातावरणातही तो शीर्षासन करणं पसंत करतो. ते यासाठी की, त्याचे म्हणणे आहे योगासनांमुळे बुद्धीला चालना मिळते. क्राईम सीनच्या ठिकाणी असताना मस्तपैकी चहाचा घोट घेत घेतच तो काही क्षणांतच केस सोडवतो. देव त्याच्या आयुष्यात एकदम एकटा आहे. जवळचं म्हणावं असं त्याच्या आयुष्यात कुणीही नाही. केसचा छडा लावताना जर त्याला काही मुद्दे स्पष्ट होत नसतील तर तो त्याची मांजर ‘मधू’ सोबत शेअर करतो. हे सगळं ऐकून तुम्हाला अंदाज आलाच असेल की, तो थोडासा विचित्र आहे. पण तो जेवढा विचित्र आहे तेवढाच चाणाक्ष देखील आहे. केस सोडवण्याचे त्याचे अनोखे प्रकार तुम्हाला नक्कीच रोमांचित करतील. चाणाक्ष डिटेक्टिव्ह देव हा गुन्ह्याशी संबंधित प्रत्येक रहस्याचा पर्दाफाश करतो. मात्र, त्याच्याच आयुष्याशी निगडित एक रहस्य अजून कुणालाही माहित नाही. या गोपनीय रहस्यामुळे त्याच्यावर एक गुन्हेगार असल्याचा ठपका लागला आहे. जगासमोर तर तो एक मोस्ट वाँटेड डिटेक्टिव्ह आहे, पण केवळ इन्स्पेक्टर नार्वेकर यांना ठाऊक आहे की, देवच्या हातून एक खून झालेला आहे.देवच्या विचार करण्याची पद्धत आणि गुन्हेगारांविरोधात त्याने खेळलेल्या चाली या आपल्यासारख्यांच्या समजण्याच्या पलीकडे नक्कीच आहेत. रहस्य, रोमांच आणि गुन्हेगारीसंदर्भातील निगडित असलेली ही मालिका नक्कीच तुम्हाला एक अविस्मरणीय अनुभव देणारी आहे. कोण आहे देव? एक मोस्ट वाँटेड डिटेक्टिव्ह की एक वाँटेड क्रिमिनल? जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका ‘देव’ ही डिटेक्टिव्ह मालिका, ५ ऑगस्टपासून प्रत्येक शनिवार आणि रविवार रात्री १० वाजता फक्त कलर्स वाहिनीवर.Attachments