Join us  

मोठ्या ब्रेकनंतर गौरी प्रधान हितेन तेजवानी रोमँटीक जोडी रसिकांच्या भेटीला

By सुवर्णा जैन | Published: October 03, 2020 12:28 PM

'कुटुंब' मालिकेत दोघांनी एकत्र काम केले आहे. या गोड जोडीला रसिकांनी भरघोस पसंती दिली. या दोघांची लोकप्रियता एवढी वाढली की, एकता कपूरनं या दोघांना तिच्या नव्या मालिकेसाठी पुन्हा एकदा कास्ट केलं.

गेल्या काही दिवसांपासून टीव्ही दुनियेपासून दूर असलेली अभिनेत्री गोरी प्रधान लवकरच 'गुप्ता ब्रदर्स' या नव्या शोमध्ये हितेन तेजवानीसह झळकणार आहे. मोठ्या ब्रेकनंतर पत्नी गौरी प्रधान रसिकांच्या भेटीला येणार असल्यामुळे सध्या उत्सुक आहे. या मालिकेत तिची भूमिका फार मोठी नसून पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत ती एंट्री करणार आहे.भूमिका छोटी असली तरी रंजक असणार आहे. 

 

हा कार्यक्रम चार भावांच्या जीवनावर आधारित  असून हितेन तेजवानी मोठा भाऊ शिव गुप्ता, आकाश मुखर्जीने हा आलोक गुप्ता, सत्या तिवारी हा वीरू गुप्ता आणि सर्वात लहान मीत मुखी हा रजत गुप्ता ची भूमिका साकारणार आहे. हा शो या भावांच्या भोवती फिरतो ज्यांना असा विश्वास आहे की त्यांना त्यांच्या जीवनात स्त्रियांची गरज नाही. ते स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी असल्याने सर्वकाही स्वतः करण्यावर विश्वास ठेवतात.

 

पवित्र गंगा नदीच्या पूर्वेला असलेल्या शहराच्या पार्श्वभूमीवर हे चार बॅचलर्स आहेत जे आपल्याला त्यांच्या जीवनाच्या प्रवासात रंजक कथा दाखवत फुल ऑन मनोरंजन करतील.तो काम करत असलेल्या मालिकेत गौरीची एंट्री होणार असल्यामुळे त्याचाही आनंद व्दिगुणित झाला आहे.या भूमिकेसाठी त्याने तिला शुभेच्छाही दिल्या आहेत. 

'कुटुंब' मालिकेत दोघांनी एकत्र काम केले आहे. या गोड जोडीला रसिकांनी भरघोस पसंती दिली. या दोघांची लोकप्रियता एवढी वाढली की, एकता कपूरनं या दोघांना तिच्या नव्या मालिकेसाठी पुन्हा एकदा कास्ट केलं. यात ‘घर एक मंदिर’ आणि ‘क्योंकी सास भी कभी बहु थी’ या मालिकांचा समावेश होता.

दोन वर्ष दोघेही एकमेकांना डेट करत होते. 2004 मध्ये त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.या दोघांना जुळी मुलं सुद्धा आहेत. मुलाचं नाव नेवान तर मुलीचं नाव कात्या असं आहे.

टॅग्स :हितेन तेजवानी