Join us  

अखेर मुहूर्त ठरला..! तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके या दिवशी बांधणार लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 12:25 PM

Titeeksha Tawde and Siddharth Bodke : तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके सोशल मीडियावर अनेकदा एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करताना दिसायचे. तेव्हापासूनच त्यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या. आता ते विवाहबंधनात अडकणार असल्यामुळे चाहतेही खूश आहेत.

सध्या मराठी कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. नुकतेच शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे यांचे लग्न पार पडले. त्यानंतर आता आणखी एक मराठी कलाविश्वातील जोडपे लग्नगाठ बांधणार आहे. हे जोडपे म्हणजेच अभिनेत्री तितीक्षा तावडे (Titeeksha Tawde) आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके (Siddharth Bodke). नुकतेच त्यांनी सोशल मीडियावर केळवणाचा फोटो शेअर करत ही खुशखबर सांगितली. दरम्यान आता त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.

तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके सोशल मीडियावर अनेकदा एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करताना दिसायचे. तेव्हापासूनच त्यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या. आता ते विवाहबंधनात अडकणार असल्यामुळे चाहतेही खूश आहेत. नुकतेच तितीक्षाने इन्स्टाग्राम अकाउंटवर सिद्धार्थसोबतचा केळवणाचा फोटो शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, "त्याने मला डेटसाठी विचारलं आणि ते केळवणात रुपांतरित झालं". त्यानंतर त्यांच्या लग्नाबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

दरम्यान आता तितीक्षा आणि सिद्धार्थच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ आणि तितिक्षा याच महिन्यात म्हणजे फेब्रुवारीच्या अखेरीस विवाह बंधनात अडकणार आहेत. आता ते दोघे त्यांच्या लग्नाची तारीख कधी जाहीर करतात हे पाहणे कमालीचे ठरेल.

वर्कफ्रंट..सिद्धार्थ आणि तितीक्षाने 'तू अशी जवळी राहा' या मालिकेत एकत्र काम केलं होतं. ती सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत नेत्राच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. तर सिद्धार्थही अनेक मालिकांमध्ये झळकला आहे. त्याने मराठीसोबत हिंदी मालिकांमध्येही काम केलंय. तसेच त्याने अजय देवगणच्या 'दृश्यम २' सिनेमातही काम केलंय. 

टॅग्स :तितिक्षा तावडे