Join us  

फरनाझ शेट्टीने उचलले एक बोल्ड पाऊल!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 10:33 AM

ज्या इंडस्ट्रीत लुक्स आणि तुम्ही कसे दिसता हे सर्वांत महत्त्वाचे असते तिथे काही लोक स्टिरिओटाइपमधून बाहेर पडण्यात आणि सर्वांचे ...

ज्या इंडस्ट्रीत लुक्स आणि तुम्ही कसे दिसता हे सर्वांत महत्त्वाचे असते तिथे काही लोक स्टिरिओटाइपमधून बाहेर पडण्यात आणि सर्वांचे मन जिंकण्यासाठी चांगले मन असणे महत्त्वाचे आहे हे सिद्ध करण्यास तयार असतात.वारिसमध्ये प्रीतची भूमिका साकारणा-या फरनाझ शेट्टीने अलीकडेच आपले केस कर्करोग रूग्णांसाठी विग बनवणाऱ्या एका संस्थेला भूमिका साकारणा-या दान करून एक धाडसी पाऊल उचलले आहे. या बाबत बोलताना ती म्हणाली की, गरजू लोकांना मदत करणे ही एक खूप सुंदर भावना आहे मग ते कर्करोगाच्या रूग्णांसाठी आपले केस दान करणे का असेना. माझे केस दान करणे ही गोष्ट पैशांपेक्षा एक वैयक्तिक भेटवस्तू वाटत होती आणि स्वतःचा एक भाग अशा व्यक्तीला दान करण्यासारखे आहे ज्याने या अत्यंत भीषण परिस्थितीचा सामना केला आहे. माझ्या केसामुळे एखाद्या व्यक्तीचा दिवस चांगला झाल्यास मला ते पुन्हा पुन्हा करायला आवडेल. ती पुढे म्हणाली की, मागच्या वेळी माझे केस फार छोटे केले होते आणि माझ्या आईने मला तसे करण्याचे कारण विचारले पण माझ्याकडे त्याचे काहीही कारण नव्हते. तेव्हापासून मी ठरवले की पुन्हा कधी कधी मला संधी मिळेल तेव्हा मी तिचा वापर कुणाच्यातरी भल्यासाठी करेन. आणि त्याचमुळे मी ठरवले की मी केस ट्रिम करणार नाही तर मी त्यांना इतके छोटे करीन की त्यांचा वापर चांगल्या कारणासाठी होईल असे फरनाझने सांगितले.फरनाझ  वारिस या मालिकेत मनूच्या भूमिकेत झळकली होती.मालिकेत प्रेक्षकांना फरनाझ एका वेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळाली होती.वारिस या मालिकेच्या प्रोमोचे चित्रीकरण करण्यासाठी फरनाझला घोड्यावर बसायचे होते. पण आजूबाजूला खूप ढोल ताशे वाजत असल्याने या आवाजामुळे घोडा चवथळला आणि त्याने फरनाझच्या पायावर अनेकवेळा पाय दिला. खरे तर तिच्या पायाला आधीपासूनच लागले असल्यामुळे तिला खूपच त्रास होत होता. पण त्याही अवस्थेतही तिने घोड्याला शांत केले आणि ते चित्रीकरण पूर्ण केले होते.वारिस मालिकेत अनेक नवीन आणि अनुभवी कलाकार झळकले.याच मालिकेमुळे नव्या चेह-यांना संधी तर अनुभवी कलाकारांना काम मिळवून दिले.अल्पावधीतच मालिकेने रसिकांची पसंती मिळवली होती.