Join us

Exclusive : ​Shocking! पहरेदार पिया की मालिकेतील रतन आणि दिया जाणार हनिमूनला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 13:45 IST

पहरेदार पिया की ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासूनच या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये चांगली चर्चा आहे. या मालिकेत प्रेक्षकांना नऊ वर्षाच्या ...

पहरेदार पिया की ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासूनच या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये चांगली चर्चा आहे. या मालिकेत प्रेक्षकांना नऊ वर्षाच्या रतन हर्षवर्धन सिंह म्हणजेच अफान खान आणि 18 वर्षांची मुलगी दिया म्हणजेच तेजस्वी वायंगणकर यांचा विवाह पाहायला मिळाला आहे. दिया आपल्या स्वतःच्या स्वप्नांचे बलिदान देऊन रतनच्या रक्षणार्थ त्याच्याशी विवाह करते अशी या मालिकेची कथा आहे. ही मालिका सुरू झाल्यापासून या मालिकेचे कथानक प्रेक्षकांच्या पचनी पडत नाहीये आणि त्यात आता प्रेक्षकांना एक मोठा धक्का बसणार आहे.पहरेदार पिया की या मालिकेतील रतन आणि दिया आता हनिमूनला जाणार आहेत. ते हनिमूनसाठी लवकरच लंडनला रवाना होणार असल्याचे कळतेय. या मालिकेत एका लहान मुलासोबत एक तरुणीचे लग्न दाखवल्यामुळेच या मालिकेवर अनेकजण टीका करत होते. पण आता त्यांना हनिमूनला गेलेले दाखवले जाणार आहे हे ऐकून तर लोकांना शॉक बसणार आहे यात काही शंकाच नाही. फक्त रसिकच नाही तर अनेक टीव्ही कलाकारही पहरेदार पिया की या मालिकेच्या कथानकावर संताप व्यक्त करताना दिसतायेत. अभिनेता करण वाहीला या मालिकेचे कथानक खटकले असून त्याने त्याच्या फेसबुक पेजवर या मालिकेविषयी लिहिले आहे की, टीआरपीच्या कंटेंटच्या नावावर लोकांना अडाणी बनवू नका. रसिक या सगळ्या गोष्टी जाणून असतात. तर या मालिकेत काम करणाऱ्या सुयश राय या अभिनेत्याने करणला उत्तर देताना म्हटले आहे की, मालिकेला इतक्या लवकर जज करणे चुकीचे आहे. मालिकेच्या आगामी भागात तुम्हाला कळेल नेमके या मालिकेचा उद्देश काय आहे ते. उगाच एकच बाजू समजून त्यावर आक्षेप घेण्यात काहीही अर्थ नसल्याचे त्याने म्हटले आहे. खरंतर या मालिकेच्या प्रोमोमध्ये एक लहान मुलगा त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या मुलीच्या भांगात कुंकू भरताना दिसतो, तेव्हापासूनच ही मालिका रसिक स्वीकारतील का अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र सद्यस्थिती पाहाता ही मालिका रसिकांना कितपत खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरते हे पाहणे औत्सक्याचे ठरणार आहे.Also Read : वादळामुळे पहरेदार पिया कीचे चित्रीकरण झाले विस्कळीत