Join us  

अभिनय माझ्यासाठी सर्वकाही - तेजस्वी प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 4:50 PM

अनेक मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारुन घराघरात पोहचलेली तेजस्वी प्रकाश ‘कर्णसंगिणी’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

-रवींद्र मोरे 

अनेक मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारुन घराघरात पोहचलेली तेजस्वी प्रकाश ‘कर्णसंगिणी’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या मालिकेत तेजस्वी कर्णाची पत्नी उर्वीची भूमिका साकारत असून तिच्या या भूमिकेविषयी शिवाय तिच्या आतापर्यंतच्या प्रवासाबाबत मारलेल्या दिलखुलास गप्पा...

* या शोमधील तुझ्या भूमिकेबाबत काय सांगशिल?- या मालिकेत मी ज्या उर्वीची भूमिका साकारत आहे त्या उर्वीबाबत कोणीही जाणत नाही, कारण महाभारत फक्त युद्धनिती, कौरव, पांडव, श्रीकृष्ण, भिम, अर्जुन, द्रोपदी, कर्ण, दुर्याेधन, भिष्म पितामह, गांधारी आदींच्या नावानेच ओळखले जाते.  यांपैकी कर्णाचा अगदी लहानपणापासून कोणीही तिरस्कार केला आहे. मात्र उर्वी अशी एकमेव व्यक्ती आहे, जी त्याच्यावर खूप प्रेम करते. त्याच्या सुखासाठी उर्वी या जगाशी लढते हे या मालिकेत माझ्या भूमिकेद्वारे दाखविण्यात आले आहे.

* ही भूमिका साकारताना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला?- भाषेची अडचण आली. मात्र कालांतराने सराव केल्याने त्यावरही मात केली. त्यातच कर्णाची पत्नीची भूमिका म्हणजे मोठे धाडसाचे काम. त्यासाठी घोडेस्वारी, डॅशिंगपणा, अ‍ॅक्शन, थ्रिल आदी सर्वांचा सामना करणे आवानात्मक होते. त्यातच सारथी बनून रथही पडवावे लागले. हे सर्व चॅलेंजिंग होते. मात्र योग्य मार्गदर्शनाने ते आवाहन पुर्णत्वास नेले.

* ऐतिहासिक आणि आधुनिक मालिकांमध्ये काय फरक जाणवतो?- मी मॉडर्न आहे आणि ही मालिका ऐतिहासिक आहे, हाच मोठा फरक आहे. मी मॉडर्न असूनही एका ऐतिहासिक मालिकेत मी एवढ्या चांगल्याप्रकारे काम करु शकते यावर माझा विश्वासच बसत नाहीय. विशेषत: प्रेक्षकांना ऐतिहासिक मालिका आवडतात, त्यामुळे मलाही अशा मालिकांमध्ये काम करायला आवडते. 

* अभिनय तुझ्यासाठी काय आहे?- अभिनय माझ्यासाठी सर्वाधिक महत्त्वपूर्ण गोष्ट असून सर्वकाही अभिनयच आहे. इंडस्ट्रीमध्ये मला जे स्थान मिळाले, माझी जी ओळख निर्माण झाली ती याच अभिनयामुळे. माझ्या या अभिनय कौशल्यामुळे मला या इंडस्ट्रीने स्वीकारले म्हणून मी स्वत:ला खूपच भाग्यवान समजते.  

* तुझे शिक्षण ग्रॅज्यएट इन इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन मध्ये झाले आहे, तर या अभिनय क्षेत्राकडे कशी वळली?- माझे वडील व्यवसायाने गायक होते. त्यातच संगीताची आवड निर्माण झाली. जरी माझे शिक्षण वेगळ्या क्षेत्रात झाले तरी अभिनयाची आवड अस्वस्थ करत होती. मुंबईमध्ये शिक्षण केले असल्याने अभिनयासाठी पोषक वातावरण मिळाले. मग हळूहळू नाटकामध्ये काम करु लागले आणि त्यातच मालिकांकडे वळली.

टॅग्स :कर्णसंगिनीतेजस्वी प्रकाश